हवामान विभाग
…या तालुक्यात विजांसह पाऊस,शेडचे पत्रे उडाले !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असताना आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव येसगाव आदी ठिकाणी पावसाने वादळासह विजांच्या कडकडाटासह हजेरी लावल्याने नागरिकांची उष्मापासून सुटका झाली आहे.मात्र तालुक्यात काही ठिकाणी पत्र्याचे शेड उडाले आहे मात्र कोठेही जीवित हानी झाली नाही.दरम्यान या पावसाने नागरिकांची मोठ्या उष्म्यातुन सुटका मात्र झाली आहे.

येवला नाका या ठिकाणी मिसळ हाऊस या जवळ असलेले झाड कोसळून पडले आहे.तर येसगाव येथील एका शेडचे पत्रे उडाले आहे.व शहर आणि परिसरात १५ मी.मी.पर्जन्याची नोंद झाली असल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.विदर्भात या पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे.त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस झाला.सोमवारी जळगाव तालुक्यासह जामनेर,पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

अमरावती जिल्ह्यात विजेच्या कडकडासह गारपीट झाली आहे तर काल नाशिक,मालेगाव आदी ठिकाणी पाऊस झाला असताना आज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरासह तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला आहे.त्यात येवला नाका या ठिकाणी मिसळ हाऊस या जवळ असलेले झाड कोसळून पडले आहे.तर येसगाव येथील एका शेडचे पत्रे उडाले आहे.तर शिंगणापूर बोलकी आदी ठिकाणी शेडचे पत्रे उडाले आहे.

कोपरगाव शहर आणि परिसरात १५ मी.मी.पर्जन्याची नोंद झाली असल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.मात्र यात अद्याप कोठे जीवित हानी झाली असल्याची खबर नाही हा दिलासा मिळाला आहे.याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दुजोरा दिला आहे.