साहित्य व संस्कृती
‘शब्दगंध’कोपरगाव शाखेच्या अध्यक्षपदी…यांची निवड
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन पुस्तक प्रकाशन करुन उजेडात आणण्यासाठी सदैव तत्पर असणारं शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य, कोपरगाव शाखेच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून अध्यक्षस्थानी ऐश्वर्या संजय सातभाई यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान या कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र (सुधिर) कोयटेयाची निवड करण्यात आली आहे.राजेंद्र कोयटे यांच्या वात्रटिका,चारोळ्या प्रसिध्द असुन यशस्वीपणे सुत्रसंचलन करत आहेत.
दरम्यान ऐश्वर्या संजय सातभाई यांची काव्यसंग्रह प्रकाशित असून कोपरगाव नगरपालिका,ब्राह्मण सभा महिला मंडळ,वनिता महिला मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
दरम्यान या कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र (सुधिर) कोयटेयाची निवड करण्यात आली आहे.राजेंद्र कोयटे यांच्या वात्रटिका,चारोळ्या प्रसिध्द असुन यशस्वीपणे सुत्रसंचलन करत आहेत.तर उपाध्यक्षपदी कैलास साळगट,अजीत कसाब,सचीवपदी स्वाती मुळे,सहसचीव म्हणून बाळासाहेब देवकर,खजीनदार म्हणून ऍड.श्रद्धा जवाद, कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.संजय दवंगे,प्रसिद्धी प्रमुख हेमचंद्र भवर,सल्लागारपदी माजी नगराध्यक्ष पदमकांत कुदळे,उज्वला भोर,सदस्यपदी प्रा.मधुमिता नळेकर, ऍड.शितल देशमुख,आनंद बर्गे,शैलजा रोहोम,नंदकिशोर लांडगे,कार्यालय व्यवस्थापक प्रमोद येवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे शब्दगंध साहित्यिक परिषद अहिल्यानगर येथील सुनील गोसावी,राजेंद्र फंड,सुभाष सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य कोपरगाव शाखेच्या वतीने नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कवितेच्या कार्यशाळा,काव्यलेखन स्पर्धा, ग्रंथ उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने शहर व तालुक्यातील सर्व साहित्यीकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.