सहकार
कोपरगाव पीपल्स बँकेच्या लाभांशाबद्दल सभासदांत समाधान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हयातील सहकारात अग्रगण्य असलेल्या कोपरगांव पिपल्स बॅकेचे सभासदांना १५ टक्के प्रमाणे लाभांशाचे वितरण बॅकेचे संचालक व सभासदांचे उपस्थितीत करण्यात आले आहे.
“कोपरगांव तालुक्यातील व्यापा-यांची कामधेनु असलेल्या या बॅकेने पारदर्शि कारभार ठेवत कोरोना काळात बाजारातील मंदीची परिस्थिती असतांनाही बॅकेने मोठी झेप घेत सभासदांना १५ टक्के लाभांश देते यावरुन बॅक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे हे स्पष्ट होते”-बाळासाहेब मांढरे,सभासद.
या वेळी बॅकेचे कैलास ठोळे,माजी अध्यक्ष अतुल काले,डाॅ.विजय कोठारी,सुनिल कंगले,अतुल काले,सुनिल बंब,वसंतराव आव्हाड,यशवंत आबनावे,हेमंत बोरावके,अॅॅड संजय भोकरे,सेवक प्रतिनिधी विरेश पैठणकर,अशोक पापडीवाल,जनरल मॅनेजर दिपक एकबोटे,सभासद मनमोहन गुजराथी,कांतीलाल जोशी,बाळासाहेब पांढरे,अॅड.वसंतराव कपीले,रसिकचंद कोठारी,सहाय्यक व्यवस्थापक जितेंद्र छाजेड,आदी मान्यवर उपस्थित होते.
बॅकेचे नुकतेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधील मंजूरीनुसार सभासदांना सन-२०२०-२१चा लाभांश १५ टक्केप्रमाणे घोषीत केला होता त्याचे तत्काळ वितरण व सभासदांचे खाती वर्ग करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी सभासद बाळासाहेब पांढरे म्हणाले की,”कोपरगांव तालुक्यातील व्यापा-यांची कामधेनु असलेल्या या बॅकेने पारदर्शि कारभार ठेवत कोरोना काळात बाजारातील मंदीची परिस्थिती असतांनाही बॅकेने मोठी झेप घेत सभासदांना १५ टक्के लाभांश देते यावरुन बॅक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे हे स्पष्ट होते.बॅकेचे सर्व कर्मचारी,संचालक मंडळ,अध्यक्ष यांनी खर्चात बचत करुन,काटकसरीचे धोरण अवलंबुन बॅकेची नफा क्षमता वाढविली आहे.बॅक थकबाकीदार सभासदांना योग्य वागणूक देउन व कायदेशीर कारवाई न करताही योग्य प्रकारे वसुली करीत आहे हेच या बॅकेचे वैशिष्टय आहे.
यावेळी अड्.कपिले,कैलास ठोळे,आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहे.