जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

कोयटे यांचे पतसंस्था चळवळीतील कार्य दिपस्तंभा प्रमाणे-खा.पवार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्षपद भूषवित असताना ओमप्रकाश कोयटे यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून ‘साठवणीतील आठवणी’ हे पुस्तक त्यांनी केलेल्या कामाचा पुरावा असून त्यांचे कार्य पतसंस्था चळवळीला दिपस्तंभा प्रमाणे असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

“महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या माध्यमातून अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे पतसंस्था चळवळ अधिक बळकट करीत असून महाराष्ट्रात पतसंस्था संख्यात्मकदृष्ट्या अधिक असून सहकार खात्याविषयी येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करून मार्ग काढत आहे.गरज पडल्यास आंदोलने,मोर्चे काढत आहे.आपण त्यांच्या राज्य फेडरेशनला आगामी काळातही सहकार्य करू”-खा.शरद पवार,अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘साठवणीतील आठवणी’ याचे प्रकाशन नुकतेच पुण्यात राष्ट्रवादीचे संस्थापक व खा.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रताप पवार,महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,अहमदनगर जिल्ह्य स्थैर्य निधीचे अध्यक्ष साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे,शांतीलाल सिंगी,सुदर्शन भालेराव,सुरेखा लवांडे तसेच राज्य फेडरेशनचे पदाधिकारी,पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने २०१६ मध्ये आर.बी.आय.वर काढलेले मोर्चे आणि आंदोलनाने पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडविले गेले आहे.आजही महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या माध्यमातून कोयटे पतसंस्था चळवळ अधिक बळकट करीत असून महाराष्ट्रात पतसंस्था संख्यात्मकदृष्ट्या अधिक असून सहकार खात्याविषयी येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करून मार्ग काढत आहे.गरज पडल्यास आंदोलने,मोर्चे काढत आहे.आपण त्यांच्या राज्य फेडरेशनला आगामी काळातही सहकार्य करू असे आश्वासन राष्ट्रवादीचे संस्थापक खा.पवार यांनी शेवटी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close