सहकार
उसतोड कामगारांसाठी आरोग्य शिबिरे काळाची गरज

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
ऊसतोडणी कामगार हे प्रतिकूल हवामानात काम करत असून त्यांना त्यांचे आरोग्य रक्षण ही काळाची गरज आहे.त्यामुळे त्यांच्या आरोग्याची संजीवनी कारखान्याने काळजी घेतली असुन आरोग्य शिबिरांचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संचालक विश्वास महाले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“उसतोडणी मजुरांची कामानिमीत्त नेहमीच भटकंती सुरू असते त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते,गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकिय मदत व मार्गदर्शन मिळायला पाहिजे यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतत विविध उपक्रम राबवत असतो”-डॉ.राजेंद्र पारखे,संवत्सर प्राथमिक आरोग्य.
ज्या कामगारांची भरती मुकादमामार्फत हंगामी स्वरूपाची भरती होते व जे कामगार ऊसतोडणीसाठी विविध भागातून एकत्र येतात व कोयत्याद्वारे ऊसतोडणी,साळणी, मोळ्या बांधून ट्रक,ट्रॅक्टरमध्ये भरणी करतात वा बैलगाडीने कारखान्यामार्फत वाहतूक करतात व ज्या कामगारांची कारखान्यावर जबाबदारी नसते,अशा कामगारांना ‘ऊसतोडणी कामगार’ म्हणून सोबधले जाते.त्यांचा आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याची समस्या गंभीर असते त्यासाठी ही शिबिरे आयोजित करण्यात येत असतात.कोपरगाव नजीक असलेल्या सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कार्यस्थळावरील उसतोडणीसाठी आलेल्या मजुर,मुकादम,कामगार,महिला भगिनी,लहान मुले-मुली यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यांत आले होते त्याचे उदघाटन करतांना ते बोलत होते.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते,रमेश घोडेराव,डॉ.विनया ढाकणे,डॉ.अश्विनी जाई बहार,आरोग्य अधिकारी डॉ.मनोज बत्रा,उसविकास विभागाचे संदिप गवळी,डॉ.ओकांर दिघे,उपमुख्य शेतकी अधिकारी सी.एन.वल्टेआदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”उसतोडणी कामगार हा कारखान्याचा महत्वाचा दुवा असुन हंगाम काळात थळामध्ये त्यांच्यासाठी ज्या मुलभूत सोयी सुविधा लागतात त्या माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने उपलब्ध करून दिल्या असुन उसतोडणी गर्भवती महिलांनी आपले आजार लपवुन न ठेवता वेळच्यावेळी ते वैद्यकिय विभागास सांगितले पाहिजे.त्यावर आरोग्य उपचार केले पाहिजे असे आवाहन शेवटी महाले यांनी केले आहे.
यावेळी स्त्री रोगतज्ञ डॉ.योगेश बनकर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की,”उसतोडणी कामगारांची आर्थीक परिस्थिती हलाखीची असल्यांने त्यांच्या आरोग्याची नेहमीच हेळसांड होते.गर्भवती महिलांना थळांत काम करतांना काय काळजी घ्यावी याचेही पुरेसे ज्ञान नसते,अशा महिलांनी वेळच्यावेळी रक्त,लघवी चाचण्याबरोबरच सोनोग्राफी,रक्तदाब तपासणी केली पाहिजे.गर्भवती महिलांचा पोषक आहार कसा असावा याचीही माहिती करून घेवुन त्यानुसार दररोजचे भोजन असावे म्हणजे येणा-या बाळाचे आरोग्य पोषक राहते.नियमीत लोहयुक्त गोळया घेतल्या पाहिजे असेही ते म्हणाले.
दरम्यान उपमुख्य शेतकी अधिकारी व त्यांच्या सर्व सहका-यांनी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यांसाठी सहकार्य केले.उसतोडणी कामगारांना यावेळी मोफत औषधांचे वितरण करण्यांत आले.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ऊस तोडणी मजुरांच्या लहान मुलांचे आरोग्य,वजन,उंची याची थेट थळात जाऊन नोंद घेत माता-भगिनींमध्ये जनजागृती केली आहे.सदर प्रसंगी शेवटी मुख्य शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांनी आभार मानले आहे.



