जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

भारत लवकरच तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनणार-…केंद्रीय मंत्री 

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  केंद्रात आम्ही तीन वर्षापूर्वी सहकार मंत्रालय स्थापन केले त्यावेळी त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते.मात्र त्यातून आम्ही मात्र विरोधकांचा अंदाज चुकीचा ठरवला असल्याचा दावा करून देश आता सहकारातून मोठे यश मिळवले असून आगामी काळात आमचा देश जगात चौथ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर लवकरच जाणार असून तो काळ फार दूर नाही असे सुतोवाच केंद्रीय सहकार व गृहमंत्री मंत्री अमित शहा यांनी आज कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सी.एन.जी.प्रकल्प आणि पोटॅश प्रकल्पाचे उद्घाटन करताना सहकार मंत्री अमित शहा.

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,”राज्यावर अस्मानी संकट आले असून राज्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.पण शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरून देऊ शकणार नाही याचे सुतोवाच करून शेतकऱ्यांना फार काही मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हेक्टरी नुकसान भरपाईबाबत मौन बाळगले आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सी.एन.जी.प्रकल्प आणि पोटॅश प्रकल्पाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते आज दुपारी ०३ वाजता संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

देशातील पहिला सी.एन. जी प्रकल्प.उद्घाटन समयी अधिकारी, कर्मचारी.

या प्रकल्पाला १०६ कोटी रुपये खर्च आला असून केंद्र सरकाकडून १० कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.या शिवाय परदेशातून फॉस्फेट आयात कमी होणार असल्याने देशाचे परकीय चलन वाचणार आहे”- विवेक कोल्हे,सहकार महर्षी कारखाना,कोपरगाव.

  सदर प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अर्थमंत्री अजित पवार,केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,जलसंपदा मंत्री गिरीज महाजन,पालक मंत्री राधाकृष्ण विखे,आ.आशुतोष काळे,संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,माजी आ.स्नेहलता कोल्हे,विवेक कोल्हे,यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुतीचे लोकप्रतिनिधीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना संजीवनी उद्योगाचे अध्यक्ष  बिपीन कोल्हे.

 

त्यावेळी पुढे बोलताना केंद्रीय सहकार मंत्री शहा म्हणाले की,”भारतात पहिल्यांदा सहकारात सी.एन.जी.प्रकल्प सुरू होत आहे.हे देशातील सहकारात नवीन मार्ग निर्माण झाला आहे.१५०० साखर कारखान्यांना एन.सी.डी.सी.कडून मदत देऊन हे प्रकल्प राबवले जातील असे आश्वासन दिले आहे.भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी मोदी सरकार प्रोत्साहन देणार आहे.नाफेड मार्फत निर्माण होणारे जैविक कचरा खरेदी केले जाईल.त्याला योग्य भाव दिला जाईल,एम.एस.पी.च्या दारात खरेदी केली जाईल, गव्हाच्या १६० रुपये एम.एस.पी.वाढवली आहे.बाजरी, ज्वारीस दीड पट वाढ केली आहे.सोयाबीनला दीड पट एम.एस.पी.दिला असल्याचे जाहीर केले आहे.त्याचा फायदा देशातील कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.हा कारखाना प्रतिदिन १२ टन निर्मिती करणार आहे.ही आयात थांबण्यास मदत होणार आहे.साखर कारखान्यांची सुरुवात केली आहे.आता हे वाढविण्याचे काम आता त्यांनाच करावयाचे आहे.फळ प्रक्रिया कारखान्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.संजीवनी उद्योग आणि शिक्षण विभागाचे लक्षणीय कामाचे कौतुक केले आहे.  

  दरम्यान या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”अमित शहा यांनी आपल्या नेतृत्वात सहकारात इथेनॉल क्रांती अस्तित्वात आली,कारखान्यांना तेल कंपण्यांनी आर्थिक फायदा मिळवून दिला.वातावरण बदलाचे परिणाम प्रतिकूल निर्माण होत आहे.मोठ्या प्रमाणावर पर्यावरण असंतुलन निर्माण झाले आहे.त्यातून राज्याचे देशाचे नुकसान करत आहे.जमिनीचे नुकसान झाले आहे.केंद्र सरकार पारंपरिक ऊर्जा स्रोत निर्माण करत आहे.परकीय चलन वाचवण्याचे काम सुरू आहे.सी.बी.जी.चा प्रकल्प महत्वाचा आहे.सेंद्रिय पदार्थापासून ऊर्जा निर्माण करण्याचे काम होणार आहे.कचऱ्यातून गॅस निर्मिती आणि त्यातून बायोफर्टीलयझर निर्माण होणार आहे.प्रति दिवशी १.१० लाख लिटर पेट्रोल वाचणार आहे.त्यातून परकीय चलन वाचणार आहे.खतावरचे परकीय चलन वाचणार आहे.यातून शेतकरी ऊर्जा दाता होणार आहे.अशा प्रकारचे अनेक प्रयोग देशात निर्माण करणार आहे.त्यासाठी हा प्रकल्प प्रेरणास्थान ठरणार आहे.यातही केंद्र सरकार योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


  दरम्यान राज्यावर अस्मानी संकट आल्याचे सांगून त्यांनी राज्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.पण शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान भरून देऊ शकणार नाही याचे सुतोवाच त्यांनी केले आहे.असे सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचे काम सरकार करणार सांगितले मात्र हेक्टरी किती नुकसान भरपाई देणार याबाबत मौन बाळगले आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

  गत ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने आ.आशुतोष काळे यांच्या उमेदवारीसाठी माजी आ.स्नेहलता कोल्हे,विवेक कोल्हे यांना थांबण्यास सांगितले आहे.त्यांनी आमचे मोठ्या मनाने ऐकले.त्यामुळे आमच्यावर त्यांची पुनर्वसन करण्याची जबाबदारी आहे.याबाबत आमचे आणि आणि अमितभाईंचे बोलणे झाले असल्याचे सांगून आम्ही त्यांच्या भविष्याची काळजी आम्ही घेणार आहे.तुमचे राजकीय भविष्य उत्तम असल्याचे गाजर दाखविण्यास ते विसरले नाही.त्यामुळे भाजपने आपले काम तमाम केल्याचे मानले जात आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”देशात सहकाराचे विविध प्रयोग सुरू केले त्यांना पाठबळ पुरवले,त्यामुळे देशात ऊर्जा क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.१० हजार कोटी आयकर माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.अमित शहा यांनी काश्मीर मधील ३७० कलम हटवले असून काशिमारात शांतता बहाल केली आहे.असे सांगून यांचे कौतुक करताना दिसून आले आहे.२०२५ आंतरराष्ट्रीय सहकार वर्षे आहे.पर्यावरण समतोल साधण्याचे काम केले जात आहे.बायोगॅस चा वापर वाढला पाहिजे असे आवाहन करून ६० लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेली,पशुधनाचे नुकसान झाले आहे.त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व उभे राहणार आहे.संकटाच्या वेळी राज्याच्या पाठीशी केंद्र सरकार उभे राहतात.मोदी आणि अमित शहा उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना यापुढे रोज बारा टन सी.एन.जी.निर्माण होणार,विवेक कोल्हे यांनी जो त्याग केला त्याची जबाबदारी आम्ही आणि अमित भाई च्या डोक्यात आहे.विविध कचरा, कपाशी आदींचा शेतीचा कचऱ्यापासून गॅस तयार करणार आहे.सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.मुख्यमंत्री त्यासाठी केंद्रात जाऊन आले असल्याचे शेवटी सांगितले आहे.

   उपस्थितांचे स्वागत विवेक कोल्हे यांनी केले तर प्रास्तविक संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी मानले आहे.

              —————————————–

*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close