सहकार
आगामी काळात १०० कोटींचा टप्पा ओलांडणार -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
संस्थेचे ठेवीदार,सभासद,कर्जदार आदींनी विश्वास दाखवल्यामुळेच संस्थेची विकासाकडे वाटचाल सुरू असून आगामी काळात ठेवीदारांच्या विश्वासावर संस्था १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष उत्तम औताडे यांनी नुकतेच पोहेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील चंद्रपंढरी सहकारी पतसंस्थेने सभासदांचे तोंड गोड करण्यासाठी व दिवाळी गोड करण्यासाठी संस्थेने दिवाळीपूर्वी १० टक्के लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष उत्तम औताडे यांनी यावेळी जाहीर केले असून सभासदानी त्याचे जोरदार स्वागत केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या पोहेगाव येथील चंद्रपंढरी सहकारी ग्रामीण पतसंस्थेची वार्षिक सभा संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सदर प्रसंगी व्यवस्थापक कैलास गुडघे यांनी अहवाल वाचन केले.यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष उत्तम औताडे यांनी संस्थेच्या आजवरच्या प्रगतीबाबतची रुपरेषा मांडली.येणाऱ्या काळात १०० कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा गाठण्याचा मानस ठेवलेला आहे.त्यादृष्टीने संस्थेचे प्रयत्न चालू आहेत.संस्थेने सभासदांचे तोंड गोड करण्यासाठी व दिवाळी गोड करण्यासाठी संस्थेने दिवाळीपूर्वी १० टक्के लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष उत्तम औताडे यांनी जाहीर केले आहे.संस्थेमार्फत मोफत लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून वाहन कर्ज,वैयक्तिक कर्ज,स्थावर तारण कर्ज,सोने तारण कर्ज,अशा विविध माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संस्थेच्या कोपरगाव व कोऱ्हाळे येथे शाखा आहेत.संस्थेला संपलेल्या वित्तीय वर्षात ५३ लाख ४२ हजार रुपयांचा नफा झाला असल्याची बाब त्यांनी गौरवाने उपस्थितांना सांगितली आहे.संस्थेला अधिकारी,वसुली अधिकारी,कर्मचारी आदींचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी उपाध्यक्ष गोरक्षनाथ थोरात,सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक कैलास गुडघे यांनी केले व आभार अभिजित पवार यांनी मानले आहे.
—————————-
*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.