सहकार
वेळेवर कर्ज फेड करण्यात सभासदांची प्रतिष्ठा-…यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
सभासदांच्या सेवेशी तत्पर असलेल्या संस्थेमार्फत गावातील छोटया मोठ्या व्यावसायिकांना,शेतकऱ्यांना,दुध व्यावसायिकांना लघु व्यवसायासाठी व शेती पुरक जोडधंदयासाठी चांगल्या प्रकारे कर्ज वितरण होत असले तरी कर्जदारांनी आपली कर्जे वेळेवर भरणे हि कर्जदाराची नैतिक जबाबदारी असल्याचे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलायला केले आहे.

“संस्थेस चालु वर्षी झालेला नफा २५ % राखीव निधी कडे वर्ग व आवश्यक त्या सर्व तरतुदी करुन उर्वरीत नफा रौप्य महोत्सव निधी कडे वर्ग करण्यात येत आहे.संस्थेचा चालु वर्षी रौप्य महोत्सव असुन त्यानिमित्त संस्थेच्या हयात असलेल्या सभासदाना संस्थेमार्फत प्रत्येकी १० ग्रॅम चांदीचे नाणे वाटप केले जाणार आहे- चंद्रशेखर कुलकर्णी,मार्गदर्शक,पंडीतराव कुलकर्णी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था,धानोरी.
कोपरगांव तालुक्यातील प्रगतीपथावर असलेल्या मौजे धामोरी येथील पंडीतराव कुलकर्णी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अरुण भाकरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी गौतम बँकेचे माजी उपाध्यक्ष पुंडलिक माळी,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मनोज जगझाप, शरदराव पवार पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुदाम गाडे,पंडीतराव कुलकर्णी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनिल जगझाप,संचालक राजेद्र वाईकर, पत्रकार निवृत्ती शिंदे,शामराव माळी,सुभाष वाघ,प्रकाश लव्हाटे,रविंद्र माळी,बबनराव वाणी,सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, संचालक माणिक सोमासे,अनिल दरेकर, कैलास बारे,पोपटराव माळी,अभिजीत उसरे, राजाराम माळी,प्रदिप खिलारी,भाऊसाहेब माळी,भाऊसाहेब खिलारी,दिलीपराव माळी,भाऊसाहेब मांजरे,दत्तात्रय माळी, सदाशिव जगझाप,सचिव मनोज कुलकर्णी,सचिन ताजणे,योगेश सोनवणे, सतिश कोळपे व मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”
लोकनेते स्वः पंडीतराव कुलकर्णी यांचे नावाने सन-२००० मध्ये स्थापन केलेली संस्था आज प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. संस्थेमार्फत गावातील छोटया मोठ्या व्यावसायिकांना,शेतकऱ्यांना,दुध व्यावसायिकांना लघु व्यवसायासाठी व शेती पुरक जोडधंदयासाठी चांगल्या प्रकारे कर्ज वितरण,कर्जदार व ठेवीदाराना विनम्र व तत्पर सेवा दिली जात आहे.संस्थेस चालु वर्षी झालेला नफा २५ % राखीव निधी कडे वर्ग व आवश्यक त्या सर्व तरतुदी करुन उर्वरीत नफा रौप्य महोत्सव निधी कडे वर्ग करण्यात येत आहे.संस्थेचा चालु वर्षी रौप्य महोत्सव असुन त्यानिमित्त संस्थेच्या हयात असलेल्या सभासदाना संस्थेमार्फत प्रत्येकी १० ग्रॅम चांदीचे नाणे वाटप केले जाणार आहे.संस्थेने एन.पी.ए.,सी.आर.ए.आर.व सी.डी.रेशिओचे योग्य प्रमाण आदर्श राखलेले आहे.
हि संस्था नावारुपास येण्यासाठी संस्थेचे सभासद पदाधिकारी,संचालक,कर्मचारी ठेव संकलन प्रतिनिधी यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला.नियमितपणे कर्जफेड करणारे कर्जदार सभासदांची सहकारी संस्थाना गरज असुन राज्यातील बहुतांश सहकारी पतसस्था वसुली अभावी अडचणीत आलेल्या आहेत.उत्तम कर्ज वसुली देण्यात सभासदांची शान असुन कर्जवसुली हा सहकारी संस्थाचा आत्मा असून कर्ज नियमित भरणे ही कर्जदाराची नैतिक जबाबदारी असल्याचे आवाहन केले आहे.
अनेक सभासदांनी संस्थेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण भाकरे यांनी प्रास्तविक केले तर ज्येष्ठ सभासद बाबुराव दरेकर,धामोरी सोसायटीचे चेअरमन चैतन्य कुलकर्णी,कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे निरीक्षक प्रा.नारायण बारे,भास्करराव वाघ,आनंदराव वाघ आदींनी आपली मनोगते व्यक्त केली आहे.सभेचे सुत्र संचालन संचालक प्रा.संदिप जगझाप सर यांनी तर व्यवस्थापक दिलीप खिलारी यांनी अहवाल वाचन केले आहे.तर शेवटी गौतम बँकेचे संचालक रामराव माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.