सहकार
…या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिला ३१ शे रुपयांचा दर!

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे कारखान्याने आपल्या ऊस उत्पादकांना आतापर्यंत २८०० रुपये प्रति टन दर दिला असून आज आयोजित सर्वसाधारण सभेत अंतिम देयक तथा तिसरे देयक १५० रुपये दिल्याने आता मागील गळीत हंगामात शेतकऱ्यांना ०३ हजार १५० दर दिल्याचे उघड झाले आहे.

सन -२०२४ च्या विधानसभा निवडणुकीबाबत काही लोक उपकाराची भाषा बोलायला लागले आहेत त्यांना बोलायला दुसरे काही उरले नाही त्यांना पण कार्यकर्ते चार्जिंग ठेवावे लागत आहे हे आपण समजू शकतो.मात्र वारंवार अशी वक्तव्य आल्यास मार्केट कमिटीची निवडणूक असेल, शिक्षक मतदार संघाची निवडणूक असेल किंवा लोक सभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुकींचे विश्लेषण करून त्यांचा तो गोड गैरसमज दूर करण्यास आपण भक्कम असल्याचा टोला आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.कोल्हे यांचे नाव न घेता लगावला आहे.
राज्यातील २०२३-२०२४ च्या हंगामात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ठरला होता.ज्याने एफआरपीपेक्षा (FRP) प्रति टन ऊसाला ६९७ रुपये जास्त दराने एकूण ३७७१ रुपये प्रति टन दर दिला होता.तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४- २५ या हंगामात गाळप झालेल्या उसाला ३४०० रुपये प्रतिटन अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला. उच्चांकी दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम राखली आहे.गेटकेनधारकांसाठी ३२०० रुपये प्रतिटन दर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
तर कोल्हापूर जिल्ह्यातील वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखान्यांने गत हंगामात शेतकऱ्यांना ०३ हजार ४०७ रुपये प्रति टन भाव दिला होता.त्यामुळे नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याउत्तर नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या बड्या नेत्यांकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र आज संपन्न झालेल्या सर्व साधारण सभेत सहकारात अग्रणी भूषण मिरवणाऱ्या व आशिया खंडात सहकारात दुसरा असे बिरूद मिरवणाऱ्या व उपपदार्थ निर्मितीत पुढारलेल्या कोळपेवाडी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अंतिम देयक १५० रुपयांचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांत नाराजी दिसून आली आहे.दरम्यान याशिवाय ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या ऊसास रु.१००प्र.मे.टन अनुदान दिल्याची समाधानाची बाब समोर आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत तोंडाला पाने पुसली असल्याची भावना निर्माण झाली आहे.

“केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी.) रु.३ हजार १०० प्रति क्विंटल माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहिर केलेला होता. सहा वर्षाचा कालावधी होवूनही साखरेच्या एम.एस.पी.मध्ये वाढ झालेली नाही.एकीकडे कच्च्या मालाचे म्हणजे ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये वाढ होत असतांना साखरेच्या किंमतीत मात्र वाढ केली जात नाही हे खेदजनकं आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव..
सदर प्रसंगी कारखान्याचे माजी अध्यक्ष माजी आ.अशोक काळे, उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, तसेच माजी संचालक बाळासाहेब कदम, ज्ञानदेव मांजरे,विश्वासराव आहेर,पद्माकांत कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी,कारभारी आगवण,नारायण मांजरे,बाबासाहेब कोते, एम.टी.रोहमारे,राजेंद्र गिरमे,मुरलीधर थोरात, मुरलीधर शेळके,सोमनाथ चांदगुडे,सोमनाथ घुमरे,सुनील शिंदे,संभाजी काळे,परसराम थोरात ॲड.शंतनू धोर्डे,धरमचंद बागरेचा, बाळासाहेब जपे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर,कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,तसेच सर्व संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष संचालक,पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती,सदस्य,नगरपालिकेचे सदस्य,कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,आसवनीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर आभाळे,सचिव सेक्रेटरी बाबा सय्यद, सहसचिव संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलतांना आ.काळे म्हणाले की,”ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या व्यवस्थेचा मुख्य कणा आहे आणि त्याच्या घामाला योग्य न्याय मिळालाच पाहिजे.सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रु. ३.७८ कोटी झालेला असून संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक कामकाजास लेखापरिक्षकांनी ऑडिट वर्ग “अ” दिलेला देवून ऑडिट वर्ग “अ” मिळाला असल्याचे सांगितले आहे.
केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी.) रु.३ हजार १०० प्रति क्विंटल माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहिर केलेला होता. सहा वर्षाचा कालावधी होवूनही साखरेच्या एम.एस.पी.मध्ये वाढ झालेली नाही.एकीकडे कच्च्या मालाचे म्हणजे ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये वाढ होत असतांना साखरेच्या किंमतीत मात्र वाढ केली जात नाही असा दावा केला आहे.साखर उदयोगामध्ये अशा प्रकारची अनिश्चितता आहे त्यामुळे अशा प्रकारच्या दरवाढी हया स्वयंचलित झाल्या पाहिजे असे मत व्यक्त करून काळानुरुप साखरेच्या एम.एस.पी.मध्ये वाढ करणे आवश्यक असून त्याबाबत साखर उद्योगाने केंद्र सरकारला वेळोवेळी विनंती केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.सहकारी चळवळीने ग्रामीण भागात आर्थिक,समाजिक व राजकीय परिवर्तन केले. महाराष्ट्राकडे सहकारी चळवळीतील देशात अग्रेसर राज्य म्हणून पाहिले जाते.त्यामुळे केंद्र शासनाने सहकारी चळवळीचे महत्व लक्षात घेऊन एक वर्षापुर्वी नव्याने केंद्रात सहकार खाते निर्माण केले त्याबद्दल केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले.
यावेळी कारखाना कार्यक्षेत्रात विक्रमी ऊस उत्पादन घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी विक्रमी ऊस उत्पादन प्रोत्साहनपर बक्षिस योजना जाहीर केली. यामध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी प्रती एकरी हे १०१ मे. टनाच्या पुढे उत्पादन घेतील त्यांना रक्कम रु.७१,०००-, ९१ ते १०० मे. टनाचे पुढे ऊस उत्पादन घेणा-यास रक्कम रु.५१,०००/, ८१ ते ९० मे.टन ऊस उत्पादन घेणा-यास रक्कम रु.३१,०००/- व ७५ ते ८० मे.टन एकरी ऊस उत्पादन घेणा-यास रक्कम रु. २५,०००/या प्रमाणे बक्षिस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. व हि योजना ही गाळप हंगाम सन २०२५-२६ व गाळप हंगाम सन २०२६-२७ या दोन वर्षाकरीता घेण्यात आलेली असून शेतक-यांनी जास्तीत जास्त एकरी ऊस उत्पादन घेवून बक्षिसांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी त्यांनी आपल्या कामाचे सिंहावलोकन करताना शिवार रस्त्यापासून ते राज्य मार्ग ०७, ७५२ जी राष्ट्रीय महामार्गा पर्यंतछोट्या मोठ्या पाणी योजनांपासून ते मंजूर बंधारा, ५ नंबर साठवण तलावापर्यंत, ट्रान्सफॉर्मर पासून ते सबस्टेशन पर्यंत, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालया पर्यंत, उजनी चारी पासून ते निळवंडे व गोदावरी कालव्याच्या आवर्तन शेतकऱ्यांना वेळेवर कसे मिळतील यासाठी केलेला पाठपुरावा व झालेल्या विकास कामांच्या जोरावर व जनतेच्या भरभक्कम पाठींब्यावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलो.त्यामुळे माझ्याबरोबरच तुमची जबाबदारी पण वाढली आहे.कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत पुढे घेवून जायचा आहे आजपर्यंत विकास कामांच्या बाबतीत पाठपुरावा करण्यात कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यात पण पडणार नाही.मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीबाबत काही लोक उपकाराची भाषा बोलायला लागले आहेत. त्यांना बोलायला दुसरे काही नाही त्यांना पण कार्यकर्ते चार्जिंग ठेवावे लागत आहे हे मी समजू शकतो.मात्र वारंवार अशी वक्तव्य आल्यास मार्केट कमिटीची निवडणूक असेल, शिक्षक मतदार संघाची निवडणूक असेल किंवा लोक सभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुकींचे विश्लेषण करून त्यांचा तो गोड गैरसमज दूर करण्यास मी भक्कम आहे असा टोला आ.आशुतोष काळे यांनी पारंपरिक विरोधक कोल्हे यांचे नाव न घेता लगावला. आपण त्यांना उत्तर देवू परंतु उत्तर देण्याची हि वेळ नाही येणाऱ्या निवडणुकांना आपल्या सर्वाना पुन्हा ताकदीने व पूर्ण क्षमतेने सामोरे जायचे आहे आणि विजयश्री खेचून आणायची आहे त्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.