सहकार
…या सहकारी पतसंस्थेने सुरू केला क्यूआर कोड !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकारात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या डॉ.शरदचंद्र पवार नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल व्यवहारासाठी आपल्या ग्राहकांसाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत त्याचा आपल्या ग्राहकांनी उपयोग करावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

एखादी गोष्ट खरेदी करून त्याचे पैसे द्यायचे असोत वा कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असोत,आजकाल क्यूआर कोडमुळे सर्व कामं सोपी झाली आहेत.अवघ्या काही सेकंदात पैसे देता येतात आणि सुट्टे पैसे नसल्यास,त्याचीही अडचण येत नाही त्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्याला डॉ.शरद पवार सहकारी पतसंस्था अपवाद राहिली नाही.
आजकाल डिजीटल जमाना आहे.सगळीकडे ऑनलाइन पेमेंट केलं जातं.दूध,फळं,भाजीपाला यापासून कपडे,भांडी घेणे ते पेट्रोल भरण्यापर्यंत सगळीकडे क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येतं.एखादी गोष्ट खरेदी करून त्याचे पैसे द्यायचे असोत वा कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असोत,आजकाल क्यूआर कोडमुळे सर्व कामं सोपी झाली आहेत.अवघ्या काही सेकंदात पैसे देता येतात आणि सुट्टे पैसे नसल्यास,त्याचीही अडचण येत नाही.क्यूआर कोडचा वापर फक्त पैशांच्या पेमेंट पुरता मर्यादित नाही.त्याचा वापर इतर कामांसाठीही होतो.आजकाल प्रत्येक प्रॉडक्ट,वस्तूंवर क्यूआर कोड असतो.तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची सर्व माहिती मिळू शकते.तसेच बिझनेसमध्येही क्यूआर कोडचा वापर होतो.बिझनेस कार्डच्या स्वरूपात ते वापरले जाते.त्यामुळे या आधुनिक सुविधेचा बँकिग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे.यात आता डॉ.शरद पवार सहकरी पतसंस्था ही सामील झाली आहे. त्यांनीही आपल्या ग्राहकांना आता क्यू.आर.कोड सुरू केला आहे.त्याचा त्यांच्या ग्राहकांना फायदा होणार आहे.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी,संचालक अनिल महाले,सुदाम वाबळे,व्यंकटेश बारहाते,महेन्द्र काळे,वीरेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर हाळनोर, तालिब सय्यद,चंद्रशेखर कडवे,भाऊसाहेब लुटे,भाऊसाहेब माळशिखरे,रविंद्र निकम,व्यवस्थापक मंगेश देशमुख,त्यांचे सहकारी तसेच व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मविभूषण डॉ शरदचंद्रजी पवार पतसंस्थेच्या क्यू आर कोड सुविधा वितरण प्रसंगी आ.आशुतोष काळे,चेअरमन देवेंद्र रोहमारे,व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी व संचालक मंडळ आदी दिसत आहेत