जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या कार्यक्रमासाठी दोन मंत्री कोपरगावात येणार !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव,संवत्सर -(प्रतिनिधी)

  गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यनिमित्त संघाच्या कार्यस्थळावर रविवार दि.२२ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता दुग्धविकासमंत्री अतुल सावे व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी आज दुपारी ०४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे.

गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यनिमित्त कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे दि.१८,१९ व २० जून २०२५ असे तीन दिवस नामवंत व्याख्यात्यांच्या प्रवचनाचे व व्याख्यांनांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले आहे.

  गोदावरी दूध संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा,स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवठा,दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांचा सन्मान, सर्वाधिक कृत्रिम गर्भधारणा करणारे कृत्रिमरेतन तज्ज्ञांचा सन्मान तसेच अपघाती निधन पावलेल्या संघातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे वितरण मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दुग्धविकास मंत्री अतुल सावे.

 

दरम्यान या तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्यात बुधवार दि.१८ जून रोजी चाळीसगांव येथील ज्येष्ठ किर्तनकार ह.भ. प.विश्वनाथ महाराज वाडेकर यांचे दुपारी २ वाजता योग,उद्योग व देव’ या विषयावर प्रवचन,गुरुवार दि.१९ जून रोजी श्रीरामपूर येथील ज्येष्ठ विनोदी व्याख्याते प्रा. हंबीरराव नाईक सर यांचे दुपारी २ वाजता ‘ हसण्यासाठी जीवन आपुले’ या विषयावर तर शुक्रवार दि.२० जून रोजी पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे सर यांचे दुपारी २ वाजता,संत परंपरा व सामाजिक प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

  

गोदावरी दूध संघ अध्यक्ष राजेश परजणे.

गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री परजणे यांनी शेवटी केले आहे.

  दरम्यान प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार सुरेश रासकर यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना उपस्थितांनी दूध संघाचे वतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close