जाहिरात-9423439946
सहकार

इथेनॉल निर्मितीच्या बंदीमुळे कारखानदारीचे गणित बिघडले-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर एक महिन्यातच केंद्र शासनाने बी.हेवी ज्युस पासूनच्या इथेनॉल निर्मितीला बंदी घालत फक्त सी.हेवी पासूनच इथेनॉल निर्मिर्तीचे आदेश काढल्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले व परिणामी साखरेचे दर कमी होवून साखर उद्योगाचे थोडे फार जुळणारे आर्थिक गणित पुन्हा बिघडले असून केंद्र शासनाने साखर धोरणांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असल्याची गरज आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे.

   

दरम्यान पश्चिम घाटमाथ्याचे पाणी पूर्वेस वळविण्यासाठी निळवंडे कालवा कृती संमतीने छ.संभाजी नगर उच्च न्यायालयात जानेवारी महिन्यात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या माध्यमातून जनहित याचिका दखल केल्यावर आ.आशुतोष काळे यांना या प्रश्नांची उबळ आली असल्याचे मानले जात आहे.

  कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२३/२४ च्या ६९ व्या विक्रमी गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.१९ एप्रिल रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या धर्मपत्नी चित्राताई बर्डे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात येवून संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी कारखाण्याचे उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,संचालक सुधाकर रोहोम,दिलीप बोरनारे,राजेंद्र घुमरे,सचिन चांदगुडे,सूर्यभान कोळपे,श्रीराम राजेभोसले,राहुल रोहमारे,प्रवीण शिंदे,शंकरराव चव्हाण,अनिल कदम,अशोक मवाळ,सुनील मांजरे,मनोज जगझाप,वसंतराव आभाळे,दिनार कुदळे,सुरेश जाधव,विष्णू शिंदे,श्रावण आसने,गंगाधर औताडे, जिनिंग प्रेसींगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह संचालक सुभाष गवळी,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव कोल्हे,सिकंदर पटेल,वसंतराव वैराळ,देवराम दवंगे,दिलीप शिंदे,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,आसवणीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”२०२३-२४ च्या गाळप हंगामाचा सर्वच कारखान्यांचा ऊस उपलब्धतेचा अंदाज चुकल्यामुळे अपेक्षापेक्षा दीड ते दोन महिने गाळप हंगाम उशीरा बंद झाला.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कारखान्याचे दोन टप्प्यामध्ये आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यात आले असून कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ६००० मे.टन एवढी झाली आहे. दोन्ही टप्प्याचे काम वेळेत व यशस्वी पूर्ण करुन चालू गाळप हंगाम २०२३-२४ हा संपूर्ण नवीन मशिनरीवर घेतांना कारखान्याच्या १६७ दिवसांच्या गाळप हंगामात एकूण ८,४५,७३४ मे.टन ऊस गाळप करून आजपर्यंतचे उच्चांकी गाळप करुन साखर उताराही समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.दिवसेंदिवस ऊस तोडणी कामगार मिळणे अवघड होत चालले आहे.त्यामुळे ऊस तोड यंत्राद्वारे तोडणी सोईची होईल अशा पध्दतीने ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी ऊस लागवड करणे काळाची गरज आहे.गळीत हंगामाच्या सुरुवातीस पक्व ऊसाची गरज असल्यामुळे आडसाली ऊस लागवड केल्यास हि गरज पूर्ण होवून कारखान्याला सुरुवातीला बाहेर गेटकेन करीता जावे लागणार नाही.टप्प्याटप्याने आडसाली,पूर्वहंगामी,सुरु या ऊस लागवडी व्ही.एस.आय.,पुणे यांच्या सल्ल्याने केल्यास कारखान्यास पक्व ऊसाचा पुरवठा होऊन ऊस उत्पादन व साखर उत्पादन वाढीस मदत होईल व शेतकी विभागास ऊस तोडणीचे योग्य नियोजन करणे शक्य होईल.पुढील हंगामात प्रतिदिन ६००० मे.टनापेक्षा जास्त गाळप करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

  सदर प्रसंगी प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले.

    पूर्वेचे पाणी पश्चिमेला वळविण्याचा प्रश्न प्रत्येक अधिवेशनात पोटतिडकीने मांडला

   दरम्यान पश्चिम घटमाथ्याचे पाणी पूर्वेस वळविण्यासाठी निळवंडे कालवा कृती संमतीने छ.संभाजी नगर उच्च न्यायालयात जानेवारी महिन्यात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या माध्यमातून नानासाहेब जवरे यांनी जनहित याचिका दखल केल्यावर आ.आशुतोष काळे यांना या प्रश्नांची उबळ आली असून हा प्रश्न अनेक अधिविशेनात मांडला असल्याचे सांगितले आहे.विशेष म्हणजे हा प्रश्न सन-१९५२ पासून प्रलंबित आहे.

   त्यावेळी त्यांनी बिपीन कोल्हे यांचा समाचार घेताना म्हटले आहे की,”ज्या त्या व्यासपीठावर ज्या त्या गोष्टी बोलतो.परंतु तालुक्यातील ज्येष्ठ नेत्याने प्रश्न उपस्थित केल्यामुळे नाईलाजास्तव बोलावे लागत आहे.निवडणुका आल्या कि,”पूर्वेचे पाणी पश्चिमेला वळविण्याचे त्यांना आठवते.ज्यांना लोकांनी नाकारले त्यांनी बोलणे हास्यास्पद असून चाळीस वर्ष एकहाती सत्ता असतांना त्यावेळी का सुचले नाही ? ज्या गोष्टीशी तुमचा संबध नाही,ज्यावर तुमचा अभ्यास नाही,त्यावर तुम्ही भाष्य करणे योग्य नसल्याचा शालजोडा लगावला आहे.

      कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६९  व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी बोलतांना कारखान्याचे चेअरमन आ.काळे,समवेत माजी आ.अशोक काळे,उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे,चित्राताई बर्डे,संचालक मंडळ दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close