सहकार
…या संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग ऑड प्रेसिंग सोसायटी लि. या सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी ०३ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.आशुतोष काळे हे होते.

कोपरगाव नजीक असलेल्या कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग ऑड प्रेसिंग सोसायटी लि.या सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी ०३ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून त्यात सर्व १३ विषय एकमताने मंजुर केले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,१९६० व नियम, १९६१ मधील कलम ७५(१) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे,सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार वर्ष समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी किंवा तत्पूर्वी घेणे राज्याच्या सहकार विभागाने बंधनकारक आहे.त्यामुळे या महिन्यात बहुतांशी सहकारी संस्थाच्या सभा संपन्न होत असतात.कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेल्या कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग सॊसायटीची सभा आज दुपारी ०३ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी व्यासपीठावर जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,उपाध्यक्ष सुभाष भास्कर सोनवणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ.बर्डे,संभाजी काळे आदी मान्यवरासह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.त्यावेळी सर्व विषय पत्रिकेवरील १३ विषय बहुमताने मंजूर करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार यांनी केले तर अहवाल वाचन महाव्यवस्थापक सुरेश काशीद यांनी केले आहे.तर अहवाल काळात ज्या राष्ट्रीय नेत्यांचे व संस्थेच्या सभासदांचे निधन आले आहे त्यांना संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष सोनवणे यांनी वाहिली आहे.दरम्यान उपस्थितांचे आभार संचालक नानासाहेब चौधरी यांनी मानले आहे.