जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

…या संस्थेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जागतिक गौरव !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जगभरातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून जनसामान्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी,त्यांना आर्थिक बळ मिळावे आणि सहकारातील पतसंस्था चळवळ अधिक बळकट व्हावी व जगभरातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेली असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन अधिक बळकट करण्याचा ठराव संमत करण्यात आला असल्याची माहिती जागतिक सहकारी पतसंस्थांच्या मेळाव्यात ॲक्यूचे खजिनदार व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

आशियाई सहकारी पतसंस्थांच्या मेळाव्यात कोयटे यांनी समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व ग्राहकांना दिली जाणारी तत्पर सेवा या विषयाचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले आहे.त्यावेळी उपस्थित सर्व देशांनी समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक तत्पर सेवेचा गुणगौरव होत असून संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे अभिनंदन केले आहे.

असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू)च्या वतीने जागतिक सहकारी पतसंस्थांच्या मेळावा नेपाळची राजधानी काठमांडू येथे ‘सोलटी’ या पंचतारांकित हॉटेल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी भारताच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे प्रतिनिधीत्व करत आहेत.ॲक्युचे अध्यक्ष व कोरियन फेडरेशनचे अध्यक्ष यौनसिक किम हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

    सदर प्रसंगी ॲक्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलेनिता व्ही.सॅनड्रॉक,रणजीत हेत्तीयाराची,ॲक्यूचे उपाध्यक्ष थायलंडचे विरा वाँगसन,फिलिपाईन्सचे निकोलस एम.वातेंटीन या देशांच्या पदाधिकाऱ्यांसह नेपाळ येथील लाबोर्डे प्रेसिडेंट आणि वर्ल्ड कौन्सिल ऑफ को-ऑफ क्रेडिट युनियनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलिस्सा मक्कार्टर,नेपाळचे लोकसभेचे सभापती आर.एच.होंदेव,राज जिमिरे आदीसह जगभरातील २६ देशांचे ४६३ प्रतिनिधी उपस्थित होते.

    सदर प्रसंगी आशियाई सहकारी पतसंस्थांच्या मेळाव्यात कोयटे यांनी समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व ग्राहकांना दिली जाणारी तत्पर सेवा या विषयाचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले आहे.त्यावेळी उपस्थित सर्व देशांनी समता पतसंस्थेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक तत्पर सेवेचा गुणगौरव होत असून संस्थेचे अध्यक्ष कोयटे यांचे अभिनंदन केले आहे.समताचे तंत्रज्ञान व ग्राहक सेवा जगातील पतसंस्थांना ही दिशादर्शक असल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष कोयटे यांनी जगभरातील सहकारी पतसंस्थांना मार्गदर्शन करावे असे वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ  क्रेडिट युनियन (डब्ल्यू.ओ.सी.सी.यू.) च्या अध्यक्षा एलिना लॅब्रॉड यांनी मनोगतातून व्यक्त करताच उपस्थित प्रतिनिधींनी टाळ्यांच्या गजरात यास अनुमोदन दिले आहे.

सदर प्रसंगी ॲक्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलेनिता व्ही.सॅनड्रॉक,रणजीत हेत्तीयाराची यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर फेडरेशनच्या संचालिका ॲड.डॉ.अंजली पाटील यांनी महाराष्ट्रात राज्य फेडरेशन संचलित सहकार उद्यमीच्या माध्यमातून करीत असलेल्या कामाचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले आहे.

सदर प्रसंगी नेपाळ फेडरेशनचे अध्यक्ष परितोष पौड्याल व केबी उप्रेती,पदाधिकारी यांनी केलेल्या नियोजनाबद्दल भारताच्या उपस्थित प्रतिनिधी ॲड.डॉ.अंजलीताई पाटील यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close