समाजकल्याण विभाग
…या विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा उपलब्ध !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आणि विविध शासकीय कागदपत्रांसाठी सिव्हिल हॉस्पिटल,अहिल्यानगर येथे जाण्याकरिता आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान या सुविधेमुळे ७० दिव्यांग विद्यार्थ्यांसह १४० व्यक्तींना वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली असुन त्यांची अडचणी दुर करून पालकांचा आर्थिक भार आ.काळे यांनी कमी केला आहे.त्याबद्दल दिव्यांगानी समाधान व्यक्त केले आहे.
दिव्यांगत्व प्रमाणपत्र,UDID कार्ड,आरोग्य तपासणी नोंदी,दिव्यांग सहाय्यक साधनांसाठी लागणारे पात्रता अहवाल,तसेच शालेय शिष्यवृत्ती अर्जांसाठी आवश्यक वैद्यकीय पडताळणी प्रमाणपत्र अशा अनेक कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कोपरगाव ते अहिल्यानगर प्रवास करताना वाहतुकीच्या गैरसोयींचा सामना करावा लागतो.दिव्यांगाना घेऊन पालकांना प्रवास करण्यात येणाऱ्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून आ.काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी डॉ.जितेंद्र रणदिवे,डॉ.सपना भंडारी,माजी नगरसेवक रमेश गवळी,फकीर कुरेशी,राजेंद्र वाकचौरे,सुनिल शिलेदार,शिवाजी खांडेकर,तुषार गलांडे,इम्तियाज अत्तार, सोमना आढाव,संतोष शेलार,मनोज नरोडे,अमित आगलावे, सुनिल फंड,वैभव कानडे,दादा नाईकवाडे,विजय त्रिभुवन,जनार्दन कदम,शुभम काळे,मुकुंद भूतडा,अर्जुन मरसाळे,राजेंद्र उशिरे,अनिरुद्ध काळे,सुवर्णा मगर मॅडम,राजेंद्र पाखर,कांतीलाल गुरसळ,सचिन म्हस्के,राणी रोडे आदींसह दिव्यांग विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
दरम्यान या सुविधेमुळे ७० दिव्यांग विद्यार्थ्यांसह १४० व्यक्तींना वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली असुन त्यांची अडचणी दुर करून पालकांचा आर्थिक भार आ.काळे यांनी कमी केला आहे.त्याबद्दल दिव्यांगानी समाधान व्यक्त केले आहे.



