जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

रामसिंग बाबा यात्रा उत्सवाचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री रामसिंग बाबा यांची यात्रा बुधवार दि.१९ एप्रिल रोजी आयोजीत केली असून त्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,”संवत्सर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री रामसिंग बाबा यांचा सालाबादा प्रमाणे याही वर्षी,’यात्रा महोत्सव’ बुधवार दि.१९ एप्रिल रोजी संपन्न होत असून त्या निमित्ताने सकाळी ०७ वाजता श्रींच्या मूर्तीस गंगा स्नान,सकाळी ०८ वाजता श्री सत्यनारायण पूजा,दुपारी ०३ वाजता जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट होत आहे.दुपारी ३.३० वाजता १०१ दिवसात पायी परिक्रमा करणारे माहेगाव देशमुख येथील भाविक भक्त नितीन महाराज भोसले यांचे जाहीर हरिकीर्तन संपन्न होणार आहे.

दरम्यान उपस्थित भाविकांना दुपारी १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नऊ चारी संवत्सर येथील श्री रामसिंग बाबा भक्त मंडळाने शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close