जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

कोपरगावात इफ्तार पार्टीचे मोठ्या उत्साहात आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे वतीने नुकतेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे प्रमुख उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.त्यावेळी शहरातील अनेक विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

रमजान रोजाची सांगता इफ्तारने होत असते.सुर्योदयापूर्वी तांबडं फुटण्यापूर्वी तर सुर्यास्तानातरची लाल कांति फिटेपर्यंत रोजा ठेवून सूर्यास्तानंतर थोडं काही तरी खाऊन पाणी प्यायले जाते.आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते या सोपस्काराला ‘इफ्तार म्हणतात.ईश्वराच्या प्रेमाखातर गरिब आणि रंजल्या गांजलेल्या अनाथ व कैद्यांना ते जेवू घालतात.आणि हे आम्ही केवळ,अल्लाखातर जेवू घालीत आहोत असे म्हटलं जाते.

रमजान रोजाची सांगता इफ्तारने होत असते.सुर्योदयापूर्वी तांबडं फुटण्यापूर्वी तर सुर्यास्तानातरची लाल कांति फिटेपर्यंत रोजा ठेवून सूर्यास्तानंतर थोडं काही तरी खाऊन पाणी प्यायले जाते.आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते या सोपस्काराला ‘इफ्तार म्हणतात.ईश्वराच्या प्रेमाखातर गरिब आणि रंजल्या गांजलेल्या अनाथ व कैद्यांना ते जेवू घालतात.आणि हे आम्ही केवळ,अल्लाखातर जेवू घालीत आहोत आम्हाला तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याची किंवा आभाराची अपेक्षा नाही.आमचा शेवट केवळ गोड व्हावा हीच आमची अपेक्षा आहे” असे म्हटले जाते.इफ्तार आता भारत भर विविध समाज बांधव आयोजित करू न मुस्लिम बांधवाप्रति प्रेमभाव व्यक्त करत असतात.असाच प्रेमभाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या पुढाकारातून आयोजित केला होता.

दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे रमजान ईद अनुषंगाने संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग शिर्डी यांचे उपस्थितीत “इफ्तार पार्टी”चे अयोजन करण्यात आले होते.इफ्तार पार्टीकरीता मशीदीचे मौलाना,मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरीक यांचेसह हिंदु,ख्रिचन,बौध्द,शिख असे सर्व समाजाचे प्रमुख धर्मगुरू व समजातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.उपस्थितीत सर्वांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देवुन शांततेत ईद साजरी करण्याबाबत सुचना देवुन मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सदर इफ्तार पार्टीकरीता कोपरगाव बेट येथील महंत रमेशगीरी महाराज,मौलाना आदिल,फादर, अजय भोसले,गुरुद्वाराचे श्री नौनियालसिंग विक्रमसिंग पोथीवाल,बौद्ध धर्मीय भंतेजी आनंद सुमनश्री यांचेसह कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,मंगेश पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे,सेनेचे माजी शहराध्यक्ष भरत मोरे,सनि वाघ,अस्लम शेख,आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशुर,माजी नगरसेवक महेमुद सय्यद,सलीम पठाण,प्रतिष्ठीत नागरीक रियाज शेख,माजी नगरसेवक महेमुद सय्यद,अकीश बागवान,इम्तियाज अत्तार,आब्बास शेख,दीपक वाजे,सुशांत घोडके यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर कार्यक्रमासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close