सण-उत्सव
…या शहरात,”पहाट पाडवा” उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
साई गाव पालखी सोहळ्याचे निमित्ताने कोपरगाव शहरात आज पहाटे सुमारास जेष्ठ नागरिक सेवा मंच,साई गाव पालखी,शारदा संगीत विद्यालय,मुंबादेवी तरुण मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने “पहाट पाडवा” भक्ती गीते,भूपाळी,लोकगीते आदींच्या साह्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सांस्कृतिक वातावरणात भर टाकणाऱ्या मैफलींमध्ये महत्त्वाचा वाटा पाडवा पहाटचा आहे.पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरूवात करणारा उत्सवच समजला जातो.कोपरगाव शहरात सुरु असलेला हा उत्सव गत दोन वर्षांपासून कोरोना साथीमुळे बंद करण्यात आला होता.मात्र त्याला यावर्षी पुन्हा बहर आला आहे.
सांस्कृतिक वातावरणात भर टाकणाऱ्या मैफलींमध्ये महत्त्वाचा वाटा पाडवा पहाटचा आहे.पाडवा पहाट म्हणजे सांस्कृतिक वर्षाची नव्याने सुरूवात करणारा उत्सवच समजला जातो.कोपरगाव शहरात सुरु असलेला हा उत्सव गत दोन वर्षांपासून कोरोना साथीमुळे बंद करण्यात आला होता.मात्र त्याला यावर्षी पुन्हा बहर आला आहे.हा उत्सव म्हणजे पिंपळपाराने खोवलेल्या बीजाचा वटवृक्ष होत चालल्याचा हा पुरावा आहे.
सदर पहाट पाडव्याची सुरुवात जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष कै.भागचंदभाऊ ठोळे यांनी केली होती. तीच परंपरा त्यांचे सुपुत्र उद्योजक कैलास ठोळे,सुधाभाभी ठोळे,राजेश ठोळे जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष विजय बंब यांनी सुरू ठेवली आहे.तिला गत दोन वर्षात कोरोना साथीने अडथळा आला होता.मात्र आता कोरोना साथ ओसरल्याने ती दोन वर्षाने पुन्हा सुरुवात केली आहे.
या कार्यक्रमात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनीही सहभाग नोंदवला आहे.
सदर समारंभासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या पुष्पाताई काळे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, ऐश्वर्या सातभाई,पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,दत्तात्रय कंगले,उत्तमभाई शहा, शैलजाताई रोहोम,रजनीताई गुजराथी,शोभाताई ठोळे,आदींसह शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
साई गाव पालखी सोहळा मुंबादेवी तरूण मंडळ जेष्ठ नागरिक सेवा मंच शारदा संगीत विद्यालयाचे वतीने बालगोपालांनी उत्साहात पहाट पाडवा साजरा केला
या सोहळ्यात ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गित गायन करून कानसेनांची वाहवा मिळवली आहे.
यावेळी वाहतूक निरीक्षक झालेल्या कोपरगावच्या कन्या वाघ,पोलिस निरिक्षक वासुदेव देसले व कलावंतांचा सन्मान करण्यात आला आहे.