सण-उत्सव
कोपरगावात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते.ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते.डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला.डॉ.आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत.आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.त्यांची जयंती कोपरगावसह देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
श्री.गो.विदयालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते झाले.या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विदयालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.गोरे एस.डी यांनी कार्यक्रम प्रास्ताविक केले.विद्यालयाचे संस्कृत शिक्षक कुळधरण बी.बी. यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.जेष्ठ शिक्षक गायकवाड आर.बी.यांनी आभार मानले.
या कार्यक्रमला पाटील आर.ई डी.व्ही.तुपसैंदर,व्ही.एम.आव्हाड,एन.के.बडजाते,जाधव ई.एल,कोताडे ए.जे,शिरसाळे एस.एन,आदी शिक्षक,शिक्षिका सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.