धार्मिक
अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा..या ठीकाणी कोपरगाव दौरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हिंदी व मराठी सिरियल तसेच मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा आज वाढ दिवस असून तो साजऱ्या करण्यासाठी त्या कोपरगाव बेट येथील गुरू शुक्राचार्य मंदिरात आल्या होत्या त्यांनी गुरू शुक्राचार्य मंदिरात दर्शन घेऊन समाधान व्यक्त केलं आहे.
कोपरगाव बेट येथील दैत्य गुरु शुक्राचार्य मंदिर हे अत्यंत प्राचीन असून त्याचे प्रचिंतत्व निर्विवाद असून त्यासाठी विविध प्राचीन संदर्भ ग्रंथ हा त्याचा पुरावा आहे.त्याकडे अलीकडील काळात दुर्लक्ष झाले होते मात्र वर्तमान व्यवस्थापन मंडळाने त्यातील बऱ्याच उणीवा दूर केल्या आहेत.त्यामुळे या प्राचीन स्थानाकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.त्यामुळे निशिंगंधा वाड यांच्या सारख्या अनेक राज्यातील तारांकित व्यक्ती आकर्षित होत आहे.
कोपरगाव बेट येथील दैत्य गुरु शुक्राचार्य मंदिर हे अत्यंत प्राचीन असून त्याचे प्रचिंतत्व निर्विवाद असून त्यासाठी विविध प्राचीन संदर्भ ग्रंथ हा त्याचा पुरावा आहे.त्याकडे अलीकडील काळात दुर्लक्ष झाले होते मात्र वर्तमान व्यवस्थापन मंडळाने त्यातील बऱ्याच उणीवा दूर केल्या आहेत.त्यामुळे या प्राचीन स्थानाकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.त्यामुळे अनेक राज्यातील तारांकित व्यक्ती आकर्षित होत आहे.त्यातील सिनेअभिनेत्री निशिंगधा वाड या महत्वाचे नाव ठरले आहे.
त्यांनी या धार्मिक ठिकाणी भेट दिली असून त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
त्यांनी सदर मंदिरातील प्रसन्न वातावरण पाहून आपल्याला गोवा येथील मंगेशाची आठवण झाली असे सांगितले आहे.यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता किंव्हा कोणताही स्टार डम न दाखविता अगदी मोकळे पणाने मंदिरात पूजा अर्चा केली आहे.या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट तर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला आहे.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,मंदिर प्रमुख सचिन परदेशी,उपमंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे,तसेच संवत्सर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भीमा सेठ,विकास शर्मा,मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा,पुजारी नरेंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.