जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सण-उत्सव

नगराध्यक्ष वहाडणे यांच्या वाढदिवसाची वेगळी शक्कल !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगांव-( नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज स्वतःचा वाढदिवस कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी कै.राजेंद्र साबळे यांच्या पत्नी श्रीमती अलका राजेंद्र साबळे यांच्या सफाई कर्मचारी वसाहत येथील घरी जाऊन साडी चोळी देऊन साजरा केला असून त्यांनी या निमित्ताने साबळे परिवारासह भोजनही केले असल्याने त्यांची हि कृती अनेकांना प्रेरणादायी ठरली असल्यास नवल नाही.

आपल्या देशाला अध्यात्माचा उच्च दर्जाचा असा वारसा लाभलेला आहे,ज्यामध्ये आपणास “कर्म योग”असं शिकवतो की,चांगले काम करत राहिले पाहिजे,दुसऱ्याबद्दल चांगले शब्द बोलले पाहिजे,दुसऱ्या व्यक्तीला आणि जास्तीत जास्त लोकांना आनंद वाटला गेला पाहिजे ज्यामुळे वैश्विक तरंगे निर्माण होऊन तो आनंद आपल्याला परत मिळतो हे अध्यात्माने त्याचबरोबर विज्ञानाने सिद्ध केले आहे याबाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे कार्य लक्षवेधी आहे.

निवडणुकांच्या तोंडावर येणारे नेत्यांचे वाढदिवस म्हणजे राजकारण्यांसाठी दिवाळी-दसरा असतो.नेत्यांच्या आर्थिक मदतीतून बॅनरबाजी,विविध कार्यक्रम राबवून वाढदिवसाचा झगमगाट सुरू असतो.वाढदिवसाच्या निमित्ताने जाहिरातबाजी,वह्या वाटप,रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर,विविध क्रीडा स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.मात्र यंदाचा वाढदिवस मात्र अपवाद ठरला आहे. विविध निवडणुका तोंडावर आल्या की मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या कृतीला भलताच चेव चढतो.मात्र नगराध्यक्ष वहाडणे यांचे तसे नाही त्यांनी चारही वर्षात वगळेपण जपले आहे.हे विशेष ! नेत्यांकडून आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी बऱ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना हि संधी वाटत असते.त्यामुळे बरेचजण बॅनर बाजी करुण आपल्या नेत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.तर अलीकडील काळात “व्हाट्स अँप” हे स्वस्तातील साधन ठरत असल्याने साखर सम्राटही या माध्यमाकडे वळले आहे.खरे तर त्यांनी आता बातम्याही बॅनर वरच प्रसिद्ध करायला हव्या आहेत.कारण त्यांना आता पत्रकार केवळ बातम्यासाठीच हवे असतात.एरव्ही त्यांना आता पत्रकार हि उपद्रवी जमात वाटत असते असो.आता काळा बरोबर वाढदिवसाच्या पद्धती तितक्याच झपाट्याने बदलत आहे.हे कोणीही नाकारणार नाही.आता हेच पाहा ना कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आता आपल्या वाढदिवसाची वेगळीच पद्धत शोधून काढली आहे.एरव्ही हि ते स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही गरीब उपेक्षित नागरिक,शहीद जवान यांच्या धर्मपत्नी,महिला यांच्या हातून झेंड्याला वंदन करून वेगळा पायंडा पाडत असतात.या वेळीही त्यांनी वेगळी पद्धत अवलंबून आपल्या वाढदिवसाकडे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यामुळे त्यांचे वेगळेपण नक्कीच उठून दिसते आहे.आपला वाढदिवस खरे तर ते कोपरगाव शहरातील स्मशान भूमी येथील मृत्यू पच्छात उत्तर क्रिया करणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन करणार होते.मात्र त्या भगिनी ऐन वेळी बाहेर गेल्याने त्यांना तेथे तो वाढ दिवस साजरा करता आला नाही.मात्र त्यांनी यावेळी वेगळी शक्कल लढवली आहे.व केवळ स्वतःच्या कुटुंबासह वाढदिवस साजरा न करता दिवंगत सफाई कर्मचाऱ्याच्या परिवारात जाऊन साजरा करणे यात आत्मिक समाधान आहे असे विजय वहाडणे यांचे म्हणणे आहे.सामाजिक समरसता केवळ भाषणे करून होणार नसून आपण त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.व त्याला कृतीची जोड देऊन त्यांनी ते सिद्ध केले आहे.त्यानां आमच्याही वतीने वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close