सण-उत्सव
पाथरवट समाजाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पाथरवट समाजाच्या महिला आघाडीच्या वतीने नुकताच समाजातील महिलासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या प्रसंगी महिलांचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.टाळेबंदीनंतर बऱ्याच दिवसांनी महिलांनी एकत्र येऊन संक्रांत वाण लुटले व मनोरंजनाचा आनंद घेतला.डान्स,संगीतखुर्ची,उखाणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.समाजातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.कार्यक्रमात कु.अक्षीता आमले हिने “स्त्री ही घरचा आणि समाजाचा कणा आहे” या बद्दल आपले मनोगत व्यक्त करून समाजातर्फे महिलांसाठी सन्मानपूर्वक विविध कार्यक्रम घेऊन समाजातील महिलांना वेगळ्या उंचीवर नेले आहे असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमासाठी श्रद्धा धानके,शीतल आमले,अनिता टोरपे,जयश्री टोरपे,तेजश्री टोरपे,अर्चना टोरपे,पल्लवी भगत,रेखा टोरपे,रेखा अनिल आमले,कविता डोंगरे,उज्ज्वला केने आदी सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.अध्यक्षा राजश्री अनिल टोरपे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर जयश्री योगेश आमले यांनी सूत्र संचलन केले आहे.