सण-उत्सव
“पुढच्या वर्षी लवकर या…”च्या जयघोषात गणेश विसर्जन संपन्न!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पोलिसांनी बंदीचे आवाहन करूनही डी.जे.च्या मर्यादित दणदणाटात आणि शांततेत पार पडला असल्याचे दिसून आले आहे.शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.त्यामुळे नागरिकांबरोबर पोलिसांनी याबाबत सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती हे लक्ष ठेवून होते तर त्यांच्या दिमतीला एक पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,एक सहाय्यक पोलिस निरीक्षक,०४ पोलीस उपनिरिक्षक ४० पोलिस कर्मचारी,५६ होमगार्ड असा लवाजमा तैनात करण्यात आला होता.

कोपरगाव शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असताना विज वितरण कंपनीने आपला गलथानपणा दाखवून दिला असून मिरवणुकीला अंधारात ढकलले असल्याचे दिसून आले आहे.आदल्या दिवशी याची प्रचिती आली होती.त्यामुळे नागरिकांनी महावितरण कंपनीविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात काल सकाळी १० वाजेपासून गणेश विसर्जनास प्रारंभ करण्यात आला होता.शहरात शेवटचा गणपतीचे विसर्जन रात्री ११.४० च्या सुमारास झाले असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती हे लक्ष ठेवून होते.
कोपरगाव शहर हद्दीतील डाऊच खुर्द येथे एकमेव एक गाव एक गणपती बसविण्यात आला होता.तर १३९ सार्वजनिक गणेश मंडळानी आपले गणपती बसवले होते.असे एकूण शहर हद्दीत १४० तर कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५५ गावात १२१ गणेश विराजमान झाले होते.याकाळात विविध गणेश मंडळानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासोबतच सामाजिक उपक्रम साजरे केले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेतली असल्याचे दिसून आले आहे.त्यासाठी शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती हे लक्ष ठेवून होते तर त्यांच्या दिमतीला एक पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,एक सहाय्यक पोलिस निरीक्षक,०४ पोलीस उपनिरिक्षक ४० पोलिस कर्मचारी,५६ होमगार्ड असा लवाजमा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी ५.३० नंतर गणेश विसर्जनास गती आलेली दिसली आहे.
दरम्यान हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी तालुका पोलिसांनी एक पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेसह,एक सहाय्यक पोलिस निरीक्षक तर ०२ पोलीस उपनिरीक्षक १८ पोलिस कर्मचारी,३३ होमगार्ड असा काफिला नेमण्यात आला होता.शेवटचा गणेश रात्री कोळपेवाडी या ठिकाणी १०.३० वाजता विसर्जित झाला आहे.त्यावेळी तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया…”पुढच्या वर्षी लवकर या…” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.