सण-उत्सव
… या गावात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे ग्रामपंचायतींचे प्रांगणात ७९ वा स्वातंत्र्य दिन सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

कोपरगाव तालुक्यातील काकडीसह विविध ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात केले आहे. ग्रामपंचायत येथे सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आहे.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.हा दिवस १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो.या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘विकसित भारत’ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देत ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात आणि भाषण करतात.या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते,संपूर्ण देश हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि देश आणि राज्यासह कोपरगाव तालुक्यातील काकडीसह विविध ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या उत्साहात केले आहे. ग्रामपंचायत येथे सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आहे.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सेवानिवृत शिक्षक मुख्याध्यापिका संध्या वाकचौरे यांचे हस्ते व
न्यू इंग्लिश स्कूल शाळेत सेवा निवृत्त शिक्षक शिंदे सर यांनी ध्वजारोहण केले आहे.यावेळी विविध स्पर्धा संपन्न झाल्या आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षीसावर आपले नाव कोरले आहे.
दरम्यान प्रारंभी विद्यार्थ्यांनी भारत मातेचा जयघोष करत प्रभात फेरीचे आयोजन केले होते.यावेळी सरपंच पूर्वा गुंजाळ यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी देशाबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आहे.उपस्थितांचे आभार कानिफनाथ गुंजाळ यांनी मानले आहे.