संरक्षण विभाग
गुजरातमधील ‘डिफेन्स एक्स्पो’ मध्ये कोपरगाव तालुक्यातील संरक्षण तज्ञास बोलण्याची संधी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
भारत सरकारने गुजरात गांधीनगर मध्ये नुकताच ‘डिफेन्स एक्स्पो’ आयोजित केला होता.त्यात निर्यातक्षम संरक्षण सामग्री प्रदर्शनात,भारताची वाटचाल आयातदार देशाकडून निर्यातप्रधान देशाकडे सुरू असून तसे जाहीर केले आहे.या प्रदर्शनात ७० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी भेट दिली असून यात ‘ब्राम्होस’ क्षेपणास्रावर काम करीत असलेल्या ‘गोदरेज’ कंपनींकडून कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी असलेले व गोदरेज कंपनीत उप-महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले तरुण अमोल बन्सी थोरात यांना संधी मिळाल्याने त्यांचे राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
अमोल थोरात यांनी,”मिसाईल सिस्टीम” मध्ये समाविष्ट असलेली स्वतंत्र व्यवस्था (डी.जी.ए.क्यु.ए.व सेमीलॉक) यात बदल सुचवले आहेत.व यात खाजगी क्षेत्राने कसा भाग घेतला पाहिजे व भारतात जास्तीत जास्त युद्ध सामग्री कशी तयार केली पाहिजे यावर भर देऊन भारताला अन्य देशावर अवलंबून राहण्याची गरज राहाणार नाही व भारत शस्रास्रात कसा स्वयंपूर्ण होईल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.अमोल थोरात हे जिल्हा बँकेचे निमगाव जाळी शाखेचे माजी व्यवस्थापक बन्सी थोरात यांचे चिरंजीव आहेत.
गोदरेजचे उप-महाव्यवस्थापक अमोल थोरात हे डावीकडून दोन क्रमांकावर छायाचित्रात दिसत आहे.
जगातील प्रमुख आयातदार देशांपैकी एक असलेल्या भारताची निर्यातदार बनण्याची महत्त्वाकांक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली असून त्याला गत आठ वर्षात कृतीची जोड देऊन आज पर्यंत स्तुत्य म्हणावी अशी कामगिरी केली आहे.भारतीय सार्वजनिक आणि खासगी शस्त्रनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देऊन सन-२०२० मध्ये नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षांसाठी ३५ हजार कोटींच्या निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले होते.देशांतर्गत संरक्षण सामग्री निर्मिती उद्योगाची उलाढाल २०२५ पर्यंत १.७५ लाख कोटी रुपयांवर नेण्याच्या महत्त्वाकांक्षा ठेवली असून त्यानुसार काम सुरु केले आहे.त्या अंतर्गत गुजरात येथे नुकतेच दोन दिवशीय ‘डिफेन्स एक्स्पो’ अर्थात ‘निर्यातक्षम संरक्षण सामग्री प्रदर्शन’ आयोजित केले होते.त्यात देशातील ‘गोदरेज’ आणि ‘टाटा’ संरक्षण उत्पादन करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या प्रतिनिधींना सदर व्यासपीठावर बोलण्याची संधी प्राप्त झाली होती.त्यात कोपरगाव तालुक्यातील जवळके या ग्रामीण भागातील रहिवासी व गोदरेज कंपनीचे ‘उप-महाव्यवस्थापक’ या पदावर कार्यरत असेलेले तरुण अभियंता अमोल बन्सी थोरात यांना संधी प्राप्त झाली आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.तर प्रमुख उपस्थिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते.
त्यावेळी भारतीय पद्धतीचे युद्ध विमान आणि शस्रास्र पद्धती निर्माण करण्यासंबंधी भारतीय हवाई दलाने औद्योगिक प्राविण्य असलेल्या तज्ज्ञांना देशात ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत,”संरक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारी धोरणात काय आणि कसे बदल करावे लागतील” यावर आपले विचार मांडण्यास पाचारण केले होते.
त्यात अमोल थोरात यांनी,”मिसाईल सिस्टीम” मध्ये समाविष्ट असलेली स्वतंत्र व्यवस्था (डी.जी.ए.क्यु.ए.व सेमीलॉक) यात बदल सुचवले आहेत.व यात खाजगी क्षेत्राने कसा भाग घेतला पाहिजे व भारतात जास्तीत जास्त युद्ध सामग्री कशी तयार केली पाहिजे यावर भर देऊन भारताला अन्य देशावर अवलंबून राहण्याची गरज राहाणार नाही व भारत शस्रास्रात कसा स्वयंपूर्ण होईल यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.त्यांनी या जागतिक व्यासपीठावर त्यांना संधी दिल्याबद्दल भारतीय वायुदल आणि आयोजकांचे आभार मानले आहे.
दरम्यान अमोल थोरात यांच्या या यशाबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,उपाध्यक्ष अड्.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,गंगाधर रहाणे,माजी सरपंच वसंत थोरात,बंडू थोरात,जवळके ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय थोरात,सदस्य प्रकाश थोरात,जनमंगल ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव थोरात,रावसाहेब सु.थोरात,डी.के.थोरात,भिवराज शिंदे,संत कवी महिपती महाराज ट्रस्टचे माजी सचिव बाळासाहेब थोरात आदींनी अभिनंदन केले आहे.