शिर्डी लोकसभा मतदार संघ विकास कामे
…या लोकनेत्यास पुरस्कार प्रदान !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ व संत भगवानबाबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या समाजभूषण पुरस्कार नुकताच शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी कथेची सांगता झाल्यानंतर प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्काराबद्दल खा.वाकचौरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान यावेळी वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांनी,”शिव म्हणजे कल्याण असल्याचे सांगून कथा व त्यातील तत्त्वज्ञानास ठान वंजारवाडी येथील खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले ही बाब अनन्यसाधारण असल्याचे सांगितले आहे.
सदर प्रसंगी अध्यक्ष महादेव दराडे यांनी स्वागत केले असून यावेळी प्रास्ताविकात अशोक दराडे यांनी केले त्यावेळी प्रतिष्ठानच्या सामाजिक व धार्मिक कार्याची माहिती दिली आहे.यावेळी वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांनी,” शिव म्हणजे कल्याण असल्याचे सांगून कथा व त्यातील तत्त्वज्ञानास ठान वंजारवाडी येथील खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी आपले प्रशासनातील काम सांगताना उपस्थितांना विविध विषयांवर प्रबोधन केले आहे.भाजपा नेते दिनकरराव गर्ने व मदनराव डोळे यांचे भाषण झाले आहे.रामेश्वर महाराज शास्त्री,गणेगाव आश्रमाचे संजय महाराज शास्त्री,विजय महाराज शास्त्री,म्हसलेकर महाराज,भिवाजी आघाव,कल्याण उभेदळ,प्रमोद गजभार,कानिफनाथ येळवंडे,शिवसेनेचे नितीन जगताप,खा.वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कार्यकाळात मोठी सामाजिक आणि राजकीय कामे केली आहे.त्यात गेली 55 वर्षे प्रलंबित असलेल्या निळवंडे प्रकल्पास केंद्रीय जल आयोगाच्या सतरा पैकी चौदा मान्यता मिळवण्यासह आपल्या मतदार संघात धार्मिक,कामे रस्ते,सभामंडप,हायमॅक्स दिवे,शाळा,अंगणवाड्या इमारती आदीसह देशातील शेतकऱ्यांच्या समस्या,रस्ते,सामाजिक समस्या आदींना वाचा फोडली आहे.त्यांना आपल्या पहिल्या कार्यकाळात देशात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारात पाचवा क्रमांक आला होता.
दरम्यान या पुरस्काराबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रूपेंद्र काले,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गंगाधर रहाणे,जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर आदींनी अभिनंदन केले आहे.

