जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शिर्डी लोकसभा मतदार संघ विकास कामे

…या गावात खासदार निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील मौजे करंजी येथील जागृत देवस्थान श्री विरभद्र महाराज मंदिरासमोरील सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात रोहित भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या प्रथम कालखंडात सभामंडप आणि देवस्थानांना मोठा निधी दिला होता.शिवाय सरकारकडून मिळणारे आपले मानधनही धार्मिक आस्थापना यांच्यावर खर्च केले होते.त्यांची मतदारांनी जाणीव ठेवून मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विश्वास टाकून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या प्रथम कालखंडात सभामंडप आणि देवस्थानांना मोठा निधी दिला होता.शिवाय सरकारकडून मिळणारे आपले मानधनही धार्मिक आस्थापना यांच्यावर खर्च केले होते.त्यांची मतदारांनी जाणीव ठेवून मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विश्वास टाकून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.त्यांनी आपला स्थानिक विकास निधी पुन्हा एकदा देण्यास प्रारंभ केला आहे.त्याची सुरुवात कोपरगाव तालुक्यातील करंजी येथून केली आहे.

   दरम्यान त्यात सन -२०२४-२५ या वर्षातील स्थानिक विकास निधी अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील एकूण १७ गावे मिळून ७२ लक्ष रुपये,केंद्र सरकारच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ५ गावे मिळून ५० लक्ष रुपये आणि जिल्हा विकास निधी अंतर्गत ७ गावे मिळून ४२ लक्ष रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

  सदर प्रसंगी करंजी येथील लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवण,पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आगवण,जेष्ठ नेते लक्ष्मण भिंगारे,सेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णा आहिरे,युवासेना उपतालुकाप्रमुख चंदू भिंगारे,शंकर सिनगर यांच्यासह विरभद्र यात्रा कमिटी सदस्य व प्रमुख ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close