व्यक्ती विशेष
…..यां नेत्याचे होणार पुण्यस्मरण !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वातून आपली ओळख निर्माण करणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक,माजी खासदार स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरण निमित्त बुधवार दि.०५ रोजी सकाळी ०९ वाजता पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे.तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार आय.ए.एस.अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या सुश्राव्य हरी किर्तनाचा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे होणार आहे अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.

आपली स्थापत्य अभियंत्यांची नोकरी सोडून ज्यांनी समाजकारण,शिक्षण,सहकार, सिंचन,कृषी,राजकारण आदी क्षेत्राची वाट धरली त्या माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील विकास,शिक्षणाचा प्रसार आणि सहकार चळवळीच्या बळकटीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते त्याची आगामी दि.०५ नोव्हेंबर रोजी १३ वी पुण्यतिथी साजरी होत आहे.
आपली स्थापत्य अभियंत्यांची नोकरी सोडून ज्यांनी समाजकारण,शिक्षण,सहकार, सिंचन,कृषी,राजकारण आदी क्षेत्राची वाट धरली त्या माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील विकास,शिक्षणाचा प्रसार आणि सहकार चळवळीच्या बळकटीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात मोलाची भूमिका बजावून,हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.त्यांच्या कार्याचा सुगंध अविरतपणे दरवळत राहावा यासाठी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे वतीने याहीवर्षी मा.खा.स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोक काळे,गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे,आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष,संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध संलग्न संस्थांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक,पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी स्व.कर्मवीर शंकररावजी काळे हितचिंतक,कार्यकर्ते ग्रामस्थ,नागरिक आदींनी कोपरगाव मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी केले आहे.



