जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
व्यक्ती विशेष

आई,थोर तुझे उपकार…! 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव – (प्रतिनिधी)

आई ही पृथ्वी पेक्षाही मोठी आहे.गौरवास्पद आहे.आपल्या परंपरेत शिक्षण संपवून गुरुकुलातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला जो उपदेश केला आहे,त्यात सर्वप्रथम “मातृदेवो भव” आईला देव मानित जा असा आदेश आहे.”ऋण न जन्मदे चे फिटे” आईच्या ऋणातुन मुक्त होता येत नाही असे मोरोपंत म्हणतात ते खोटे नाही.याची अनुभूती आम्हा जवरे पाटील कुटुंबास येत आहे.


“आज आम्हासह नगर-नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावांना जे निळवंडेचे ५४ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडानंतर सिंचनाचे पाणी मिळाले आहे.या पाण्यासह परिसराचा ग्रामविकास,काकडी विमानतळ,पोल्ट्री संघटना,विविध सामाजिक कामे करण्याचा जो संस्कार लाभला त्याला या मातापित्यांच्या संस्कार कारणीभूत आहे हे सांगण्यास मुळीच कमीपणा वाटणार नाही”- नानासाहेब जवरे,राज्य प्रसिध्दी प्रमुख शेतकरी संघटना,संस्थापक निळवंडे कालवा कृती समिती,अहिल्यानगर-नाशिक.

  “आई !थोर तुझे उपकार” आशा अर्थाची कविता पूर्वी क्रमिक पुस्तकात होती.श्रीमत शंकराचार्य यांच्या सारख्या महापुरुषाने ही सन्यास धर्माच्या थोडेसे बाहेर जाऊन आई शब्दाचा मान ठेवला.संन्यास्याने कोणालाही नमस्कार करु नये.मुलगा संन्यासी झाला तर बापानेही त्याला नमस्कार करावा.पण श्रेष्ठ संन्यास धर्मातही जन्मदात्री आईला नमस्कार करावा असा आचार आहे.महाराष्ट्राचा सुर्वणकाल,काही शतके ज्यांनी इथे राज्य केले असे “सातवाहन” त्यांचा सर्वात पराक्रमी राजा “गौतमीपुञ सातकर्णी ” स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावतो (आता आता राज्यातील नेत्यांनी ही थोर परंपरा पुन्हा एकदा सुरु केली आहे) श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक काळात त्यांच्या आईचा-जिजाऊ माँसाहेब-प्रभाव त्यांच्यावर आढळतो.शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा,मार्गदर्शन,पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छत्रपती शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय असली तर नवल नाही.

निळवंडे धरणाचे जलपूजन करताना गं.भा.गंगुबाई जयराम जवरे या निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह दिसत आहे.सोबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,संस्थापक नानासाहेब जवरे,सौ.कमलबाई पोकळे,अन्य पदाधिकारी दिसत आहे.

   माझी आई थोर कुळात जन्मली नसली तरी तिचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही.तिची फरफट जन्मापासून सुरू झाली होती.जन्मानंतर तिचे आणि तिच्या अन्य दोन भावंडांचे मातृ-पितृ छत्र बालपणात हरवले होते.तो काळ हाता तोंडाची गाठ लागलीच पडण्याचा नव्हता.दुष्काळाच्या झळा सोसण्याचा होता.एकुलता एक भाऊ पांडुरंग,एक बहिण नर्मदा असा काहीसा त्यांचा संसार होता.ज्या घरात ते जन्मले त्या दुष्काळी कासारे गावच्या मातीच्या आणि धाब्याचा घरात त्यांचे सलग आई,बाप आणि एक बहिण असे तीन माणसे एका महिन्यात देवाघरी गेले होते.तेंव्हा काकडवाडीच्या देवीच्या भक्ताने त्यांना तात्काळ घर बदलण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती ती स्वतः देत असे.त्या नंतर पहिल्यांदा सांगितले त्या ‘ नर्मदा’सह दोघी बहिणी एक ‘ पांडुरंग ‘ नावाचा भाऊ असे तिघेच शिल्लक उरले होते.अखेर त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता.त्यांचा सांभाळ त्यांच्या गाढे या मामाने डांगेवाडीत केला होता.त्यामुळे लग्नं करण्याची ऐपत नसल्याने व गावातील भाऊबंदांनी जमिनीवर डोळा ठेवल्याने स्व.सखाराम कांडेकर या तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तिचे लग्न त्यावेळी जवळके येथील प्रतिष्ठित असलेल्या स्व.माजी सरपंच रामभाऊ थोरात यांच्या मध्यस्थीने अवघ्या बारा तेराव्या वर्षी जवळके येथील अकाली वैधव्य आलेल्या अनुसया जवरे कुटुंबातील जयराम या तरुणाशी (म्हणजे आमच्या वडिलांशी) लावून दिले होते.अर्थात त्या काळात ती समाजमान्य प्रथाच होती.त्या वेळी एकुलत्या एक भावाची जमीन वाचली एवढीच मोठी उपलब्धी त्यांच्या हाती लागली होती.मात्र इकडे लग्नासाठी मात्र चार-पाच एकर जमीन अवघ्या पाचशे रुपयांत काही गावगुंडांनी गुंडाळली होती.म्हणजेच आगीतून फुफाट्यात येण्याची नामुष्की तिच्या वाट्याला आली होती.तिचे प्रारब्ध तिला अजिबात चुकले नव्हते.

स्व.गंगुबाई जवरे यांचा पणतू चि.विहान भागवत यांचे पहिल्या वाढदिवसाचे निमित्ताने सर्व मुले,मुली,जावई,नातवंडे आदी संमवेत दिसत आहे.

आमचे आई वडिलांनी आम्हाला आर्थिक दुर्बल स्थितीमुळे मोठे काही दिले नसेल मात्र संस्काराची शिदोरी मात्र आम्हा भावंडाना आयुष्याला पुरून उरेल इतकी दिली आहे.

   जवळके हा भागही दुष्काळी होता.(आजही आहे) इकडे वेगळी स्थिती नव्हती.मात्र त्यातही आईने धीर सोडला नाही.थोडी उरलीसुरली जमीन त्यात पोट भरणे कठीण असल्याने त्यांना गोदावरी कालव्यांच्या खाली असलेल्या ठिकाणी,खरीप किंवा रब्बी पिके खंडाने कष्टासाठी घेणे’ हा एकच पर्याय उरला होता.त्यातही ती आणि आमचे वडील स्व.जयराम जवरे आदींनी ते काम मोठ्या कष्टाने केले त्याला तोड नाही.कधी गावांवर तर कधी परगावी असा यांचा सतत राबता राहिला.मात्र त्यांनी जोडलेली माणसे आजही त्यांच्या प्रामाणिक पणाची साक्ष देताना दिसून येतात.मुलांना जन्म देणं,त्यांचं मोठ्या ममतेनं संगोपन करणं,शिक्षणाचं आणि संस्काराचं शिंपण करून त्यांना सर्व अंगांनी बलवान करणं,हे सारं काम ती निरपेक्ष वृत्तीने पार पाडते.म्हणूनच मानवी जीवनाचं सातत्य अखंडपणे प्रवाहित होतं.साऱ्या प्राणिसृष्टीत हा क्रम चालू राहतो.त्याला तीही अपवाद नव्हती.तिचे संस्काराचे शिंपण आजही आमच्या मनावर अधिराज्य करत आहेत.त्यावेळी त्यांच्या प्रामाणिक पणाची साक्ष पटल्याशिवाय राहत नाही.त्यांचा प्रामाणिकपणा,कोणत्याची कष्टाची तयारी,सोशिकता,विनम्रता आदी गुण आजही आमचेसह आम्हा भावंडांची शिदोरी बनली आहे.मुलाला जन्म देण्यात त्याचे पालन पोषण करण्यात आईला अपरंपार कष्ट सोसावी लागतात,हे खरेच. पणपित्याला ही आपल्या मुलाला वाढवताना अतिशय दक्ष राहावे लागते.त्याला आमचे आई-वडिल अपवाद नव्हते.

मुलांना जन्म देणं,त्यांचं मोठ्या ममतेनं संगोपन करणं,शिक्षणाचं आणि संस्काराचं शिंपण करून त्यांना सर्व अंगांनी बलवान करणं,हे सारं काम ती निरपेक्ष वृत्तीने पार पाडते.म्हणूनच मानवी जीवनाचं सातत्य अखंडपणे प्रवाहित होतं.साऱ्या प्राणिसृष्टीत हा क्रम चालू राहतो.त्याला तीही अपवाद नव्हती.तिचे संस्काराचे शिंपण आजही आमच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

   काही काळ त्यांनी शेती वाट्याने करण्यासह गाय म्हशींचे संगोपन या जोड व्यवसाय करून आयुष्यात आपल्या भूमातेच्या पांग फेडण्यासाठी त्या काळचे मोठे कार्य समजले जाणारी एक विहीर खोदून ठेवण्याचे कार्य करून ठेवले आहे.हे काम सुरू असताना त्यांनी आणलेल्या सूताराकडून विटी-दांडू करून दिल्याने मला आज ही स्मरत आहे.त्यावर एक थारुळे,त्यावर बैल जोडून मोट,नाड्याच्या सहाय्याने गाणं गात विहिरीतून शेतात पाणी देण्याचे भाग्य मला लाभले आहे.आजच्या तरुण पिढीला मोट,नाडा या बाबी चित्रात दिसू शकतात.बऱ्याच वेळा आईचे न ऐकल्याने वडिलांकडून हट्टीपणामुळे व्यवहारात झालेले नुकसान आई मोठ्या दुःखद अंतकरणाने सांगत असे.त्या नंतर दोन्ही बहिणींचे केलेले लग्न त्यांच्या आयुष्यातील मोठी उपलब्ध होती.त्यातील मोठी बहीण कमलबाई आणि जावई मारुती पोकळे यांनी वेळोवेळी त्यांना अडचणीच्या काळात केलेली मदत ते आम्हाला कायम स्मरण करून देत असत.तिच्यावर दुःखाचे डोंगर कायम कोसळत राहिले.आधी बहिण नर्मदाबाई शेळके हीचे आणि काही अंतराने तिच्या पांडुरंग महिपती कार्ले या एकमेव भावाचे जून १९९१ मध्ये निधन झाले होते.त्यामुळे आता ती एकमेव राहिली होती.तो धक्का तिला पचवणे अवघड गेले होते.त्यानंतर एकमेव बहिणीचा मुलगा सीताराम शेळके यांच्या निधनाने तिचा आक्रांत आजही स्मरतो.त्यांच्यावर तिने बहिणी पाठोपाठ खरेखरे प्रेम दिले होते.त्यातून जेंव्हा जेंव्हा आठवण येत असे तेंव्हा तिचा दुःखाचा आवेग अनावर होत असे.

नातू विवेक जवरे याचे लग्नाचे निमित्ताने सर्व नातेवाइकांसह स्व.गंगुबाई जयराम जवरे दिसत आहे.

   आमचे आई वडिलांनी आम्हाला आर्थिक दुर्बल स्थितीमुळे मोठे काही दिले नसेल मात्र संस्काराची शिदोरी मात्र आम्हा भावंडाना आयुष्याला पुरून उरेल इतकी दिली आहे.वडिलांचे दि.२१ जून २००४ रोजी असाध्य आजाराने निधन झाले होते.त्यांना वाचिवण्यासाठी आम्हा भावंडांना मोठे प्रयत्न करूनही आमच्या पदरी अपयश आले होते.आई कधी आजारी पडल्याचे आम्हाला तरी आठवत नाही मात्र तर मार्च महिन्यात आईला असाध्य आजाराचे गाठले होते.त्यातून तिला अवघ्या सात महिन्यात देव तिला दि.०८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.१७ वाजता आपल्या घरी घेऊन गेला आहे.त्यामुळे उरलेसुरले मातृ छत्र हरपले आहे.

   कवी यशवंत यांनी म्हटले आहे- ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’.कवी माधव ज्युलियन यांनी ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ असे वर्णन केले आहे.खरेच आपल्या प्रत्येकाच्या आईसाठी एक खास स्थान असते.आई ही कुटुंबाचा आधार म्हणून महत्त्वाची आहे,पण मानव संस्कृतीत ‘आई’ ही एक इच्छा संकल्पना आहे.आपण धाराला भूमाता म्हणतो,नद्योही गंगामैया,यमुनामैया म्हणतो.आपल्या देशाला मातृत्व म्हणतो ते यथार्थ आहे.मात्र मृत्यू कोणालाही चुकत नाही हे सत्य आहे.त्याला आईसह कोणीही अपवाद नाही.श्रीरामासारखा पती असुन ही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते.द्रौपदीचे पाच रक्षक असुन ही वस्त्र हरणावेळी तीचे कोणी नव्हते.राजा दशरथाला चार पुत्र असुन ही अंत्य समयाला जवळ कोणी नव्हते.लंकाधीश रावणा जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते.भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते.शरशैय्ये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते.अभिमन्युवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते.या जगात आपलं कोणीच नाही.आपले कर्म चांगल ठेवा,त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे.आमची आई आमच्या डोळ्यादेखत निघून गेली पण आम्हाला बघत राहाण्याखेरिज  काही ही करता आले नाही.तिला ईश्वरचरणी नक्कीच चांगले स्थान मिळेल यात शंका नाही.आज तिच्या पश्चात मोठी बहीण कमलबाई मारुती पोकळे,इंदुबाई दादासाहेब भागवत,भाऊ रामकृष्ण जवरे,प्रल्हाद जवरे,नातवंडे आदींवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या भूमि तील मातृभक्ति,मातृप्रेम वादातीत आहे
           “मातृ देवो भव: पितृ देवो भव: अतिथि देवो भव:
            असे म्हणताना प्रथम आईला दैवतसमान म्हटले आहे ते उगीच नाही.

   या दुःखात आम्हाला शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,माजी आ.अशोक काळे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व संभाजीनगर उच्च न्यायालय वकील संघाचे माजी अध्यक्ष अड.अजित काळे,साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,दैनिक ‘युवा वर्ता’चे संपादक किसनराव हासे,समाजसेवक रतीलाल लोढा,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,मंगेश पाटील,राजेंद्र सोनवणे,उद्योजक प्रसाद नाईक,कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,संचालक दिनार कुदळे, राहाता नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पिपाडा,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,शिर्डी,कोपरगावसह नगर जिल्ह्यातील पत्रकार संघटना,पदाधिकारी,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कोपरगाव शहर,शिर्डी,राहता,आणि नजीकच्या तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,नातलग आदींनी आप्तस्वकीयांना यातून सावरण्याची जी शक्ती दिली त्याला तोड नाही.आमच्या या आई स्व.गंगुबाई जयराम पा.जवरे यांना दशक्रिया विधी निमित्त विनम्र अभिवादन !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close