जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

लोकशाहीत माध्यमांचं आणि पत्रकारांचं आजही मोठं महत्व-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

माध्यमांचं काम माहिती देणं,प्रशिक्षण,शिक्षण करणं,मनोरंजन करणं,प्रबोधन करणं असतं असं सांगितलं जातं.लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं.त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत,त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व उद्योजक कैलास ठोळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा,नफा कमावण्याचा धंदा नसतो.माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे,माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही नागरिकांची अपेक्षा असते.पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे,त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं”कैलास ठोळे,अध्यक्ष,श्रीमान गोकुळचंद विद्यालय कोपरगाव.

महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते म्हणून हा ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात येतो तो आज कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात आज सकाळी ११ वाजता पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्या वेळी अध्यक्षस्थानारून ते बोलत होते.

सदर प्रसंगी संस्थेचे सचिव दिलीपराव अजमेरे,लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेश ठोळे,जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे,संदिप अजमेरे,शिवाजीराव गायकवाड,लक्षण वावरे,जनार्दन जगताप,फकीर टेके,योगेश डोखे,हपीज शेख,सुनील ससाणे,अनिल दीक्षित,छायाचित्रकार हेमचंद्र भवर,बिपीन गायकवाड,किसन पवार,मनीष जाधव,शाळेचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर आदीसह बहुसंख्येने पत्रकार विद्यार्थी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा,नफा कमावण्याचा धंदा नसतो.माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे,माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही नागरिकांची अपेक्षा असते.पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे,त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं.म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत,वसा म्हणून स्वीकारावं,असे आवाहन त्यांनी केले आहे.तसेच वर्तमानात सरकारने जागतिकीकरण स्वीकारले असून ता परदेशी विद्यापीठांना परवानगी दिली असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना देशातच उच्च दर्जाचे परदेशी शिक्षण मिळणार आहे.त्यामुळे याबाबत पत्रकारांनी जागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोपरगाव तालुक्यात पिण्याचा आणि शेती पाण्याचा,रस्त्यांचा,विजेचा प्रश्न आजही गंभीर असून पत्रकारांनी त्यात लक्ष घालणे आवश्यक आहे.त्यांनी खऱ्या अर्थाने लक्ष घातले ते हा प्रश्न मिटण्यास वेळ लागणार नाही असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत श्री गायकवाड सर यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन दिलीपराव अजमेरे,पत्रकार नानासाहेब जवरे,आदींनी केले आहे.तर सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार रायते मॅडम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close