विशेष दिन
कोपरगावातील…या महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सत्तावन्न महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.अ.नगर तसेच कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ निमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकतेच मोठ्या उत्साहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
२१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला.११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.पंतप्रधान मोदींचा हा ठराव नव्वद दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला होता जो आता कोपरगावसह जगभर साजरा करण्यात आला आहे.
२१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला.११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या १७७ सदस्यांनी २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.पंतप्रधान मोदींचा हा ठराव नव्वद दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर करण्यात आला,जो संयुक्त राष्ट्रामध्ये कोणत्याही दिवसाच्या ठरावासाठी सर्वात कमी वेळ मानली जात आहे.तो जगभर साजरा करण्यात येत आहे.कोपरगाव येथेही तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी ५७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.अ.नगर यांच्या आदेशान्वये कोपरगाव सेक्टर येथील एस. एस.जी.एम.महाविद्यालय तसेच राहता,शिर्डी,कोळपेवाडी,येवला व कोपरगाव येथील विविध शाळेमधील व महाविद्यालयांमधील एन.सी.सी.छात्र सैनिक सदरील ‘योग दिना’निमित्त के. जे.सोमैया महाविद्यालयातील प्रांगणामध्ये मध्ये एन.ओ.सोबत हजर होते.
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना यातील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला आहे.
सदर कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील योग खेळाडू विद्यार्थी प्रज्वल ढाकणे वैष्णवी ढाकणे, युवराज नलगे यांनी एन.सी.सी.छात्र सैनिकांना व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व सोबत छात्र सैनिक व विद्यार्थ्यांनीही विविध आसन केले त्यामध्ये योग खेळाडू विद्यार्थ्यांनी या आसनांचे महत्त्व सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.व्ही.एस.साळुंके यांनी केले तर नियोजन शारीरिक शिक्षक संचालक प्राध्यापक डॉ.कुटे,डॉ.शिंदे यांनी केले होते,तर कार्यक्रमाचे आभार एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे प्राध्यापक लेफ्टनंट चौधरी यांनी केले आहे.सदर ‘योग दिना’च्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी,सदस्य संदीप रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.