विशेष दिन
सत्य बातमी पोहचविणे ही पत्रकारांची जबाबदारी-जाणिव

न्यूजसेवा
कोपरगाव-(शिवाजी गायकवाड)
समाजात अनेक चांगली कामे सुरू असताना काही प्रसंगी हितशत्रू चुकीची माहिती समाजात पसरवत असतात.मात्र सत्य आणि अचूक बातमी नागरिकांपर्यंत पोहोचविणे हि पत्रकारांची जबाबदारी असल्याचे रोख ठोक मत जेष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक डॉ.विजय चोरमारे यांनी कोपराव तालुक्यातील गौतम नगर येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“नुकत्याच पार पडलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत अवघ्या ४०९ मतांनी नगराध्यक्षपद हुकले.२०१६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्ण पॅनल लढविला मात्र विरोधकांनी मात्र दोन पक्ष मिळून एक पॅनल तयार केला होता तरी त्यावेळी राष्ट्रवादीला ०७ जागा मिळाल्या होत्या.२०२५ च्या निवडणुकीत विरोधकांनी लोकसेवा व अपक्ष यांच्या सोबत आघाडी करूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक विजयी होऊन जनाधार वाढून सक्षम विरोधी पक्ष दिला आहे”-आ.आशुतोष काळे.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे.यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.त्यांनी भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला होता.जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.त्या हा दिवस राज्यभर आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सत्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे,कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक डॉ.मच्छिंद्र बर्डे,सुधाकर रोहोम,आनंद चव्हाण,बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव,प्रशांत घुले,श्रावण आसने,श्री कोळपे, कोपरगाव,राहाता,शिर्डी,पुणतांबा आदी ठिकाणाहून बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,” ज्या भागात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीतून नागरिकांच्या राहणीमानात अमुलाग्र बदल झाले व सहकाराच्या माध्यमातून कशा प्रकारे विकास साधला जावू शकतो हे कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना परिसराच्या प्रगतीवरून दिसून येते.त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीतही चुकीचे गैरसमज असल्याचे दिसून येते असे अनेक नरेटिव्ह सोशल मिडीयाच्या माध्यमातून बेमालूमपणे पसरविले जातात त्याची कोणी सत्यता पडताळूनही पाहत नाही असे मत व्यक्त करून त्यांनी,” कारखाना व उद्योग समूहाच्या संदर्भात पत्रकार वर्षभर बातमीदारीच्या माध्यमातून प्रसिद्धी देतात या कृतज्ञता पोटी पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो हे कौतुकास्पद आहे.आजच्या काळात पत्रकारिता खूप जोखमेची झालेली आहे.आपला जीव धोक्यात टाकून पत्रकारिता करणे आवश्यक नाही परंतु खरी आणि प्रामाणिक पत्रकारिता करणे तेवढेच गरजेचे आहे.आजकाल पत्रकारितेचे स्वरूप आणि पत्रकारांची मानसिकता बदलत चालली आहे त्यामुळे आपण कुठून कुठे चाललो आहे याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली असल्याचे शेवटी सांगितले आहे.
यावेळी बोलताना आ.आशुतोष काळे म्हणाले की,”पत्रकार समाजाचा आवाज महणून कार्य करत असल्याने लोकशाहीमध्ये पत्रकारांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात पत्रकारितेचा सिंहाचा वाटा राहिला आहे.तेव्हा पासून आजतागायत पत्रकार बंधू-भगिनी समाजाच्या न्याय हक्कासाठी नागरीकांचा आवाज बनून अविरत लढा देत आहेत.दररोज नवीन आवाहने आणि नवीन प्रश्न,समस्या मांडण्याचे प्रामाणिक प्रयत्न पत्रकार करत असतात.सामाजिक अन्याय,आणि राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण करून लाखो नागरिकांना जागरूक करण्याचे काम पत्रकार करीत आहेत.अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी खरं तर सोपी नाही मात्र बदलती पत्रकारिता स्वीकारून आपले काम अविरत आणि निर्धास्तपणे पत्रकार करीत आहेत याचा मनस्वी अभिमान असल्याचे प्रतिपादन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.



