जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

संत सेना महाराजांचे चरित्र प्रेरणादाई -…यांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  संतश्रेष्ठ सेना महाराजांचे चरित्र समाजासह इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगत कोपरगाव शहरातील नाभिक समाज राबवीत असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

 

श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले ‘जाता पंढरीसी सूख वाटे जीवा’ असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला.तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.कोपरगाव येथे संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे.

कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले ‘जाता पंढरीसी सूख वाटे जीवा’ असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला.तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.कोपरगाव येथे संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण बिडवे,संत सेना नाभिक समाज मंदिर ट्रस्टचे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव,उपाध्यक्ष सोमनाथ व्यवहारे,सचिव सचिन वैद्य,कचेश्वर कदम,भाऊसाहेब बगळे, सुरेश कदम,भाऊसाहेब बगळे,मुकूंद जाधव, संजय सोनवणे,गोरख वैद्य,शेखर निकम, दिनेश संत,नाभिक समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा छाया वैद्य,उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी,समाज बांधव,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

  त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,नाभिक समाजाचे आणि काळे परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.नाभिक समाजाच्या समाजिक सभागृहासाठी ५० लक्ष निधी दिला आहे.संत सेना महाराजांनी समाज प्रबोधन आणि कर्माला महत्त्व देण्याचा संदेश दिला.त्यांच्या कार्यातून आपल्याला सेवा,समर्पण आणि श्रमप्रतिष्ठेचे शिकवण मिळते.संत सेना महाराजांनी केवळ देवभक्तीच नव्हे तर सेवा, श्रम आणि समाजप्रेम यांचा संदेश दिला. त्यांच्या जीवनातून ‘कर्म हीच खरी पूजा’ हे शिकायला मिळते.नाभिक समाजाने ही शिकवण जपली असून, समाजाने शिक्षण, सेवा व कष्ट यांच्या बळावर प्रगतीचा आदर्श घालून दिला आहे.आजच्या विद्यार्थ्यांनीही अभ्यासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा त्यांच्या मेहनतीचा सन्मान असून अशा उपक्रमांमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

  यावेळी प्रास्ताविक राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण बिडवे यांनी केले तर सूत्रसंचालन संत सेना नाभिक समाज मंदिर ट्रस्टचे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष सोमनाथ व्यवहारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close