विशेष दिन
…या शाळेत योग दिन उत्साहात संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

योग दिन हा २१ जून रोजी सकाळी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे.या दिवसांबद्दल अनेक लाभाद्यांबद्दल माहिती देताना विविध स्थानिक विकासाच्या उद्देशाने आणि समुदाय एकत्रितपणे एकत्रित करण्यासाठी योग ही एक प्राचीन मन-शरीर चिकित्सा आहे जी उगम पावली आहे.हा योग दीन आज कोपरगावसह जगभर साजरा करण्यात आला आहे.
योग दिन हा २१ जून रोजी सकाळी आरोग्य सेवा कार्यक्रम आहे.या दिवसांबद्दल अनेक लाभाद्यांबद्दल माहिती देताना विविध स्थानिक विकासाच्या उद्देशाने आणि समुदाय एकत्रितपणे एकत्रित करण्यासाठी योग ही एक प्राचीन मन-शरीर चिकित्सा आहे जी उगम पावली आहे.हा योग दीन आज कोपरगावसह जगभर साजरा करण्यात आला आहे.तो कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

दरम्यान यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की,”विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी आपली जीवनशैली योगमय करून नियमित योग साधना केली पाहिजे.आपले शरीर आणि मन सुंदर घडवायचे असेल,तर प्रत्येकाने दिवसाची सुरवात योग साधनेने करावी असे आवाहन केले.
दरम्यान यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिन हा विद्यार्थ्यांना योगाभ्यासाद्वारे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिक्षकांनी उत्साहाने विद्यार्थ्यांसोबत विविध योगासने करण्यात सहभाग घेतला.एकूण १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक,हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे,हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव,क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती.