विशेष दिन
… या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
ज्या काळात महिलांना सामाजिक जीवनात फारसा वाव नसतांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरं बांधली,धर्मशाळा उभारल्या त्या जनतेवर प्रेम करणाऱ्या प्रेमळ राज्यकर्त्या होत्या.त्यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला त्या न्यायप्रिय आणि समाजहिताचा विचार करणाऱ्या आदर्श प्रशासक आणि जनकल्याणकारी राजकर्त्या असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतातील,माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी माहाराणी’ म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी नर्मदा तीरी,इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते.त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स.१७६६ ते इ.स.१७९५,म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत २७ वर्षे माळव्यावर राज्य केले होते.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले,एवढचं नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले.त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले.त्यांत द्वारका,काशी,उज्जैन,नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.त्यांच्या त्रिशताब्दी जयंती कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, व कोळपेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे नेतृत्व,सेवाभाव यांचे प्रतीक असून त्यांचा आदर्श आपल्याला प्रेरणा देतो.त्यांचे शासन केवळ रस्ते,घाट,धर्मशाळा व मंदिरे उभारण्यातच नव्हते,तर त्यांनी लोकहिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हे आजही आदर्श मानले जातात.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एक महान स्त्री शासिका नव्हत्या,तर त्या एक आदर्श समाजसेविका,धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आणि न्यायप्रिय प्रशासनकर्त्या होत्या.ज्या काळात महिलांना सार्वजनिक जीवनात फारशी संधी नव्हती, अशा काळात अहिल्यादेवींनी नेतृत्व केले हेच त्यांच्या धैर्याचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक असून त्यांचे मूल्य,कार्यपद्धती आणि सेवा-भाव यांचा आदर्श समोर ठेवून नवा सामाजिक बदल घडवण्याची प्रेरणा प्रत्येक पिढीला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ.काळे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले आहे.यावेळी जयंती उत्सव समिती व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आ.काळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.