विशेष दिन
…या शहरात डॉ.आंबेडकर यांची जयंती संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण कोपरगाव मतदार संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

आयुष्यभर समानतेसाठी लढणारे डॉ.आंबेडकर यांना समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.ते त्यांच्या मानवी हक्क चळवळीसाठी,संविधान निर्मितीसाठी आणि त्यांच्या अफाट विद्वत्तेसाठी जगभरात ओळखले जातात.
डॉ.आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती,डॉ.भीमराव आंबेडकर,ज्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते,त्यांचा वाढदिवस १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो.आयुष्यभर समानतेसाठी लढणारे आंबेडकर यांना समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.आंबेडकर हे त्यांच्या मानवी हक्क चळवळीसाठी,संविधान निर्मितीसाठी आणि त्यांच्या अफाट विद्वत्तेसाठी जगभरात ओळखले जातात आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो कोपरगाव येथे तो दिवस आज अजित पवार राष्ट्रवादी च्यावतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.