विशेष दिन
भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारांच्या हत्या ही चिंतेची बाब-…यांचे प्रतिपादन
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
गडचिरोली भागात भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारांची हत्या होत असेल तर ही चिंतेची बाब आहे.त्याबाबत पत्रकारांनी संघटित होण्याची गरज असून पत्रकारांना दात आणि नखे दाखविण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन न्युज १८चे उपसंपादक विलास बडे यांनी कोपरगाव तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला म्हणून हा दिन राज्यभर साजरा करण्यात येतो कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने आज सकाळी ११वाजता कारखाना कार्यस्थळावर न्युज १८ चे उपसंपादक विलास बडे यांच्या उपस्थितीत व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,सचिन चांदगुडे,राहुल रोहमारे,वाल्मिक कोळपे,बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव आदीसह कोपरगाव,राहाता तालुक्यातही पत्रकारासंह मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पत्रकारिता ए.आय. च्या उंबरठ्यावर आली आहे नवीन पिढी स्मार्ट झाली असून ज्या शंभर वर्षात बदल झाले नाही इतके बदल दहा वर्षात झाले आहे.त्यामुळे आता पत्रकार त्याला सामोरे जाण्यास तयार आहे का? नवीन यू.ट्यूब.चॅनल चे मालक होता येते.पूर्वी वर्तमान पत्र किंवा चॅनल चालू करणे अवघड होते.पण आता सामान्य तरुण रातोरात संपादक बनत आहे.आगामी काळात या बदलांना आता नवीन पत्रकारांना सामोरे जावे लागेल.असे सांगताना वाघ आणि शेतकऱ्याच्या मुलीचे उदाहरण देऊन पत्रकारांनी आपले नख आणि दात सांभाळावे लागतील असा इशारा दिला आहे.
गडचिरोली भागात भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकारांची हत्या होत आहे ही चिंतेची बाब आहे.त्याबाबत संघटित होण्याची गरज आहे.पत्रकारांना दात आणि नखे दाखविण्याची वेळ बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मिळाली असल्याचे ठणकावून सांगितले आहे.सामान्य माणसाचा आवाज आपण आहोत.याचे भान ठेवण्याची गरज आहे.आपण सतत १९ दिवस ही भूमिका मांडत आहे यात दोषी असतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.या घटनेत जातीवाद टाळणे गरजेचे आहे.आपण कोणाच्या अजेंड्याचे बळी तर ठरतं नाही ना याची जाणीव ठेवायला हवी.परळीत एक वर्षात १०९ मृतदेह सापडले आहेत.ही धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे.आपण सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा वस्तुस्थिती दाखवणे गरजेचे आहे.त्या ठिकाणी धार्मिक ठिकाणी अनेक जण मृत्युसाठी तिर्थस्थळी येत असतात.त्यामुळे त्यातील चार जण असे वादग्रस्त मृत्यू असल्याचे सांगणे गरजेचे आहे.केवळ व्ह्यू मिळविण्यासाठी अशा गोष्ठी करू नका विश्वासाहर्ता कमी होत जात असेल तर त्याला आपण जबाबदार आहोत असा दावा केला आहे.
जंगलात जाऊन आपण वाघाला अडचण निर्माण करणार असाल तर संकट समोर दत्त म्हणून हजर होऊ शकते याची जाणीव निर्माण होणार आहे का नाही असा सवाल त्यांनी केला आहे.पत्रकार लढण्याची भूमिका सोडतायेत का असा तिखट सवाल त्यांनी केला आहे.आपण समाजहितासाठी काम करतो की स्वतःसाठी याचा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे वर्तमानपत्रातील पाने घटत आहे.व्यवसाय घटत आहे.त्याची जाण राजकीय नेत्यांत आली आहे.त्यामुळे दर्जेदार बातम्या आणि विश्वासाहर्ता वाढवावी लागेल.पत्रकारांना आपली गुणवत्ता वाढवावी लागणार आहे तरच आपण आगामी काळात टिकू शकणार आहे.
पत्रकारांच्या आर्थिक स्थितीवर चित्र रेखाटताना त्यांनी पत्रकारांना आता मान आणि धन मिळत नाही.याची कोणी दखल घेणार आहे का असा रास्त सवाल त्यांनी केला आहे. व पत्रकारांना राजाश्रय देण्याची गरज प्रतिपादन केली आहे.कारण पत्रकारिता राहिली तरच सामान्य नागरिकांना न्याय मिळू शकतो.भारताचा तालिबान होऊ द्यायचा नसेल तर पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे आवाहन बडे यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी पत्रकार बडे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या कर्मवीर काळे सहकारी साखर कारखानदारीच्या कामाचे कौतुक केले असून आमच्या नजीकच्या कारखाने बंद पडत असता व राज्यात अनेक ठिकाणी ही विकासाची बेटे लयाला जात असताना काळे यांनी सहकारी साखर कारखानदारी जिवंत ठेवली असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
कोपरगाव तालक्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचार चर्चेत असताना व त्यावर कोपरगाव तहसील कार्यालयात वादग्रस्त जनता दरबार संपन्न झाला या पार्श्वभूमीवर प्रास्तविक आ.आशुतोष काळे यांनी केले त्यावेळी त्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या वादग्रस्त जनता दरबाराचा उल्लेख केला असून त्यांनी आपण निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असताना प्रशासनाकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली असून करताना त्यामुळे प्रशासन मोकाट सुटले असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.व माजी खा.स्व.शंकरराव काळे,माजी आ.अशोक काळे यांना तालुक्यातील पत्रकारांनी साथ दिली आमचे दोष दाखवून दिले असल्याने यथोचित वाटचाल करता आली असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचलन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर मनोगत सोमनाथ सोनपसारे यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी मानले आहे.