जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

डॉ.आंबेडकर महानिर्वाण…यांचेकडून अभिवादन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   समतेचा आदर्श उभारणारे,दलित,शोषित,पीडित वर्गांसाठी जीवन समर्पित करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या शिक्षण,स्वातंत्र्य आणि समानतेसाठी संघर्ष केला.त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करणे आवश्यक आहे.

   आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते.याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले.निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता,त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात.त्यांचा महानिर्वाण दीन आजही त्यांचे समर्थकांसह मोठ्या संख्येने देशात मानला जातो तो कोपरगाव येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने नुकताच संपन्न झाला आहे.

  सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,उपाध्यक्ष अशोक आव्हाटे,माजी नगरसेवक मंदार पहाडे,बाळासाहेब आढाव,शिवाजी खांडेकर,वैभव आढाव,मेहमूद सय्यद,फकीर कुरेशी,रमेश गवळी आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाच्या शिक्षण,स्वातंत्र्य आणि समानतेसाठी संघर्ष केला.त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी आपले सर्वस्व समर्पित करणे आवश्यक आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला असून आजच्या काळात त्यांची शिकवण अधिक महत्त्वाची आहे.त्यांनी दिलेली शिकवण प्रत्येक भारतीयासाठी एक प्रेरणा असून त्यांच्या विचारांचे पालन करणे हि खरी त्यांना आदरांजली ठरेल अशा शब्दानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील गंगुले यांनी प्रास्तविक केले तर सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार मेहमूद सय्यद यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close