आरोग्य
कोपरगाव तालुक्यात रुग्णवाढ स्थिरच

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात घसरत असंताना दिसत आहे.सरकारने आता विविध उपाय योजना करून लसी देण्याचे प्रमाण वाढवले आहे.मात्र कोपरगाव,संगमनेर,राहाता तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुःखी वाढली आहे.
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी ०४ व सोनेवाडी येथे हद्दीत पुन्हा ०३ रुग्णवाढ झाली असून त्या पाठोपाठ सावळीविहिर ०२,गोधेगाव,बहादराबाद,देर्डे-कोऱ्हाळे, तळेगाव मळे,वारी,शिंगणापूर आदी ठिकाणी प्रत्येकी ०१ रुग्ण आढळला आहे.तर कोपरगाव येथे केवळ ०२ रुग्ण आढळला आहे.तर तालुक्यात १५ अशी रुग्णवाढ नोंदवली आहे.
कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ३९९ रॅपिड तपासण्या करण्यात आल्या असून त्यात ०१ रुग्ण बाधित आढळले असून ३९८ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ४३० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १२ तर अँटीजन तपासणीत ०१ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात वाढ होऊन १७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ०२ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ७३० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ११० रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २२४ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०२ लाख ११ हजार ३१२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०८ लाख ४५ हजार २४८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०६.९७ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार ३९६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.७३ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३७ हजार ०५० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ७६९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख २६ हजार ३०२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ९७८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.पुढाऱ्यांचे वाढदिवस,यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असून मंदिरे काही प्रमाणात खुले केली असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान आता शाळा,कॉलेज सुरु झाले असून आता चित्रपट व नाट्यगृहास पन्नास टक्के क्षमता गृहीत धरून परवानगी देण्यास तयार झाले आहे.जिल्ह्यात जवळपास एकसष्ठ गावे प्रतिबंधित केले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील गोधेगावचा समावेश होता. या तालुक्याचा आलेख अलीकडील काळात चिंताजनक वाढला होता.त्यामुळे प्रशासनाने आता कोरोना लसीचा वेग विलक्षण वाढवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही रुग्णसंख्या रोडावण्यास मदत होत आहे.