विशेष दिन
…या ठिकाणी संविधान दिन उत्साहात संपन्न
न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर या दिवसाचे औचित्य साधुन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.या वर्षी संविधान स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे सोमैय्या महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यावेळी कोपरगाव शहरात प्रभात फेरी काढण्यात आली होती.
यावेळी प्रा.राऊसाहेब गायकवाड,प्रा.परीक्षित जाधव,प्रा.संपत आहेर,प्रा.आदित्य देशमुख,प्रा.किरण सोळसे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
या प्रभात फेरीच्या उद्घाटन प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.विजय ठाणगे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्राचार्य प्रो.विजय ठाणगे यांनी संविधानाचे महत्त्व नमूद करतांनाच संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव असल्याचे म्हटले.स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय,राष्ट्रीय एकता,धर्मनिरपेक्षता इत्यादी बाबी संविधानामुळे आपणांस मिळाल्या असल्याने सर्व नागरिकांनी संविधानाचा आदर व सन्मान केला पाहिजे.
याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सर्व स्वयंसेवकांची महाविद्यालय ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक यापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली.या स्मारकाजवळ राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड यांनी संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला न्याय व हक्क या बाबी नमूद केल्या आहे.डॉ.सुरेश देवरे यांनी संविधानाची उद्देशिका सर्वांसमोर वाचून दाखविली.डॉ.संजय दवंगे यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.