जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

वाचनाचा व्यासंग जीवनात यशस्वी करतो-जगताप     

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

                                                                                      वाचनसंस्कृती जोपासने ही काळाची गरज आहे.वाचनाच्या व्यासंगातून जीवनात निश्चितपणे यशस्वी होता येत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नुकतेच केले आहे.

“वर्तमान काळात वाचनसंस्कृती लोप पावल्याचं दुर्देवी चित्र पाहायला मिळत आहे.एकीकडे मोबाईलच्या दुकानात रांगा आणि दुसरीकडे ग्रंथालये वाचकांविना ओस पडत आहे.हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी वाचनाचा संकल्प करावा”- सुहास जगताप,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

   भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम शेवटच्या श्‍वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते.म्हणूनच 15 ऑक्‍टोबर ही त्यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जावी याला विशेष औचित्य आहे.वाचन ही अशी सिद्धी आहे,की त्यामुळे आपल्याला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात.डॉ. कलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा वाचन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी दिनकर खरे,कोपरगाव नगरपरिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक अशोक ढेपले प्रमुख अतिथीसह अभ्यासिकेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी,ग्रंथालयाचे वाचक,नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”
वाचनातून विविध अनुभव आपल्याला मिळत असतात.लोकपरंपरा,संस्कृती,व्यक्तिमत्व यांची ओळख होते.अलीकडच्या काळात वाचनसंस्कृती लोप पावल्याचं दुर्देवी चित्र पाहायला मिळत आहे.एकीकडे मोबाईलच्या दुकानात रांगा आणि दुसरीकडे ग्रंथालये वाचकांविना ओस पडत आहे.हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी वाचनाचा संकल्प करावा.दिवसाला किमान दहा पानं नियमित वाचण्याची सवय अंगी रुजवावी आणि आपलं जीवन समृद्ध करावे असे आवाहन जगताप यांनी शेवटी केले आहे.
कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close