विशेष दिन
…या शहरात महावीर जयंती उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात अहिंसा व प्रेमाचा संदेश देणारे भगवान महावीर जन्मकल्याण दिन आ.आशुतोष काळे व गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी झाला होता.वर्तमानात हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते.२३ वे तीर्थंकर पार्श्वनाथजी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी त्यांचा जन्म झाला.जैन ग्रंथानुसार,जन्मानंतर,देवांचे मस्तक,इंद्राने मुलाला सुमेरू पर्वतावर नेले आणि मुलाला क्षीरसागराच्या पाण्याने अभिषेक केला आणि शहरात आले.वीर आणि श्रीवर्गमान यांनी ही दोन नावे ठेवली आणि उत्सव साजरा केला.याला जन्म कल्याणक म्हणतात.प्रत्येक तीर्थंकराच्या जीवनात पंचकल्याणक उत्सव साजरा केला जातो.कोपरगाव शहर वासीयांच्या वतीने हा दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी अजित लोहाडे,उद्योजक कैलास ठोळे,अनिल काले,दिलीप अजमेरे,मुनिष ठोळे,अशोक पापडीवाल,महावीर दगडे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा,सुरेश ठोळे,संजय ठोळे,नितीन कासलीवाल, सचिन अजमेरे,माजी नगरसेवक अतुल काले,डॉ.अमोल अजमेरे,माजी नगरसेवक मंदार पहाडे,पत्रकार किशोर पाटणी,प्रविण लोहाडे,डॉ.अभय दगडे,आर.के.काले,गोकुळ गंगवाल,मुन्ना पाटणी,आनंद पहाडे,पियुष गंगवाल, सचिन ठोळे,सुयोग ठोळे,भय्युशेठ ठोळे,विजय कासलीवाल,राजेश ठोळे,विठ्ठलराव तुंबे,नेमीचंद जैन,बाबासाहेब गुरव आदींसह राजकीय पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते आदींसह समाजाचे ट्रस्टी,पंच व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी आ.आशुतोष काळे बोलताना म्हणाले की,”आजच्या युगातही युवकांना भगवान महावीराचे विचार आंहीसेची प्रेरणा देणारे शांतीमय आयुष्य प्रेरीत करणारे असुन भगवान महावीराची शिकवण सगळ्या विश्वाला आंहीसेचा शांतीचा संयमाचा व माणुसकीचे देणारे होते भगवान महावीराचे विचार सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देतात असे मत व्यक्त केले आहे.
सदर प्रसंगी जैन समाजाच्या वतीने देण्यात येणारा कुंभ कळसाचा मान गौरव अजमेरा व टिक्कल अजमेरा यांना देण्यात आला होता.तर दुपारी मोटार रॅली काढण्यात आली होती.भगवान महावीराच्या जन्म उत्सवाचा मान किरण बडजाते,दिलीप बडजाते,प्रविण बडजाते आदींना प्राप्त झाला होता.यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे.