जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विशेष दिन

…या शहरात शिवजयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंत आज कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून आज प्रथमच आ.आशुतोष काळे यांनी हेलीकॉप्टर च्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत छत्रपतीस शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आहे.त्यावेळी तरुणांनी,”जय शिवाजी,जय भवानीचा” जय घोष करून आसमंत दुमदुमुन सोडले असल्याचे दिसून आले आहे.

   

दरम्यान कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई,आकर्षक धबधबे तसेच ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांना “ मराठा अभिमान ” आणि प्रजासत्ताक भारताचा महान नायक म्हणून देखील संबोधले जाते.त्यांनी १६७४ साल पश्चिम मराठा साम्राज्याची स्थापना केली.त्यांनी मुघल लढाई आणि संहार अनेक वर्षे घालवली.दि.१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवाजी महाराजांचा जन्म मराठा घराण्यात शिवनेरी किल्ल्यात झाला होता.जग या दिग्गज मराठी सुपुत्रांची जन्म ३९ ४ वी जयंती साजरी करतआहे.हा दिवस राज्य सार्वजनिक सुट्टी चा जाहीर केला आहे.राजा शिवाजी महाराजांची विलक्षण बुद्धिमत्ता सर्वश्रुत होती.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी नौदल लष्कराची कल्पना मांडणारे पहिले भारतीय राजे म्हणून त्यांना श्रेय दिले जाते.त्यांची जयंती कोपरगाव सह जगभर साजरी करण्यात येत आहे.

  दरम्यान भारतात देशभर ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटके साजरी केली जातात.त्या निमित्त भव्य मिरवणुका,उत्सव साजरे करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते.कोपरगाव येथे आज तर प्रथमच हॅलोकॉप्टरच्या साहाय्याने पुष्पवृष्टी केली आहे.मात्र त्यावेळी जमिनीवर व रस्त्यावर पाणी मारले नसल्याने धुळीचे लोट उठताना दिसले होते.व उपस्थितांच्या डोळ्यात व अंगावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचली असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्या निमित्त पहाटे ५.३० वा.महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी,उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्यासह नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक,पूजन,आरती करण्यात आली आहे.त्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यगीत गायन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आ.आशुतोष काळे यांनी प्रथमच हॅलीकॉप्टरच्या साहाय्याने पुष्यवृष्टी करण्यात आली मात्र त्यावेळी मोठे धुळीचे लोट आकाशात उठल्याने नागरिकांना पळता भुई थोडी झालेली दिसून आली आहे.


           सदर कार्यक्रम प्रसंगी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय जगताप,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,मंदार आढाव,मनोज नरोडे यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी,नगरपरिषदेच्या माध्यमिक,प्राथमिक शाळांचे शिक्षक,शिक्षिका तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
         दरम्यान नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई,आकर्षक धबधबे तसेच ध्वनिक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली होती.याकरिता विद्युत अभियंता रोहित सोनवणे व त्यांच्या टिमने विशेष परिश्रम घेतले.तसेच एम.के.आढाव विद्यालयाचे बाळासाहेब विखे,मारुती काटे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे अमित पराई व निलेश बुचकुले यांनी जयंती सोहळा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


तर कोपरगावात राष्ट्रवादी अजित पवार गट व धर्मवीर शाम भाऊ मित्र मंडळ तसेच खडकी येथे मिरवणूक काढण्यात आली आहे.तर निवारा उपनगरात साई निवारा प्रतिष्ठानच्या वतीने वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली असल्याची माहिती माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिली आहे.उशिरापर्यंत मिरवणुका सुरु होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close