विशेष दिन
…या शाळेत शालेय वस्तूंचे वितरण उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
रयत शिक्षण संस्थेच्या संवत्सर येथील शाखेत आपली सेवा बजावलेले शिक्षक स्व.रामनाथ काळे त्यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले.महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी देऊन सन्मानित केले.त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने संवत्सर येथे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ होते.सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.’कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले.महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना ‘कर्मवीर’ ही उपाधी देऊन सन्मानित केले.भारत सरकारने १९५९ मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन आणि १९८८ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून भाऊराव पाटील यांचा सन्मान केला होता.त्यांची जयंती कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील,’जनता इंग्लिश स्कूल’ येथें नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी आ.काळे यांच्या हस्ते शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी संभाजी काळे,महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप बोरनारे,माजी संचालक बाळासाहेब बारहाते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,रयतचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे,बाळासाहेब कासार,गौतम बँकेचे संचालक शिरीष लोहकणे, बाळासाहेब जगताप,शरद पवार पतसंस्थेचे संचालक व्यंकटेश बारहाते,संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे,सदस्य तुषार बारहाते,सुभाष नाजगड,माजी प्राचार्य मच्छिन्द्र पिलगर,पुंजाराम बडवर,विजय आहेर,रविंद्र खर्डे,श्रीकांत काळे, प्रतीक काळे,विनायक राजोळे,मेजर सुखदेव काळे,मेजर विनोद थोरात,मधुकर साबळे,सुनील कुहिले,लक्ष्मण साबळे, अखिलेश भाकरे,ज्ञानेश्वर खैरनार,प्राचार्य मोरे,स्व.रामनाथ काळे सर सोशल फाउंडेशन,माहेगाव देशमुखचे सदस्य,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.