विशेष दिन
…या शाळेत ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद शिक्षण मंडळात मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते.५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुट्टानी,तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ.राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते. ते एक विद्वान, तत्त्वज्ञ होते आणि त्यांना भारतरत्न पुरस्कारदेखील देण्यात आला होता.त्याच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिन देशभर साजरा करण्यात येतो तो कोपरगाव नगरपरिषद शिक्षण मंडळात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बाळासाहेब गांगुर्डे होते.
सदर प्रसंगी अरुण पगारे,अनुराधा सोनवणे,गीता चौधरी,संतोष जाधव,अर्जुन शिरसाट,दस्तगीर कुरेशी,यास्मिन शेख,मुदसिरा,शबनम शेख,फहीमुन्नीसा शेख,अंजुम शेख,नसीम शेख,ईशरत मॅडम,अमोल कडू आदी शिक्षक उपस्थित होते.
कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य नफा मनपा शिक्षक संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका कल्पना निंबाळकर व आदर्श पुरस्कार प्राप्त नसरीन पठाण यांचा तर ‘रायगड जिल्हा अविष्कार सोशल एज्युकेशनल फाउंडेशन’च्या वतीने सुनिता इंगळे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत शिंदे यांनी तर सूत्रसंचालन सुनील रहाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक ज्योती पवार यांनी मानले आहे.