निवडणूक
कोपरगाव तालुक्यातील गट-गणांचे आरक्षण अखेर जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांची व जिल्हा परिषदेच्या ६ गणांची आरक्षणाची सोडत २८ जूलै २०२२ रोजी काढण्यात आली असून आहे.त्याबाबत तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान नगर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जाहीर झाले असून कोपरगाव तालुक्यातील- सुरेगाव (अनुसूचित जमाती), शिंगणापूर (अनुसूचित जमाती महिला), करंजी बु. (इतर मागास वर्ग महिला), सवंत्सर (सर्वसाधारण महिला), कोळपेवाडी (सर्वसाधारण महिला), पोहेगाव बु. (सर्वसाधारण) साठी राखीव झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार ही सोडत काढली गेली आहे.पंचायत समितीच्या १२ गणांसाठी आरक्षण सोडत तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बालाजी क्षिरसागर यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढली गेली आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे,नायब तहसीलादर मनीषा कुलकर्णी,राष्ट्रवादींचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,कर्मवीर कारखान्याचे माजी संचालक सुनील शिंदे,संचालक राहुल रोहमारे,सचिन चांदगुडे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे,माजी सदस्य नानासाहेब गव्हाणे,सेनेचे तालुकाध्यक्ष रंगनाथ गव्हाणे,सुरेगावचे माजी सरपंच सचिन कोळपे,रोहिदास होन,डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान कोपरगाव पंचायत समितीचे आरक्षण काढताना उपस्थित अधिकाऱ्यांचा घोळ निर्माण झाला होता त्या ठिकाणी पंचायत समिती गणाऐवजी जिल्हा परीषद गटाचा पुकारा करण्यात आल्याने उपस्थितांचा घोळ निर्माण झाला त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तुम्ही गट जाहीर करून बोलत असल्याचे निदर्शनास आणल्यावर ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ती चूक दुरुस्त करण्यात आली आहे.
जाहीर झालेल्या गणांची नवे व पुढे आरक्षण दर्शवले आहे.धामोरी-सर्वसाधारण पुरुष,सुरेगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्गीय महिला,ब्राम्हणगाव-अनुसूचित जाती जमाती पुरुष,शिंगणापूर -अनुसूचित जाती-जमाती पुरुष,करंजी बु.-सर्वसाधारण पुरुष,दहिगाव बोलका-इतर मागासवर्गीय पुरुष,संवत्सर-अनुसूचित जातीजमाती महिला,कोकमठाण-सर्वसाधारण महिला,जेऊर कुंभारी- कोळपेवाडी- अनुसूचित जाती महिला,पोहेगाव-सर्वसाधारण पुरुष,रांजणगाव देशमुख-सर्वसाधारण महिला आदींचा समावेश आहे.
नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार करावे असे आवाहन माहिती विजय बोरूडे यांनी केले आहे.
दरम्यान आता गट आणि गंणाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत तर अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.