जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विधी व न्याय विभाग

कोपरगावात लोकन्यायालयात…इतके दावे निकाली,

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील न्यायालयात नुकतेच लोकन्यायालय संपन्न झाले असून सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले होते त्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून यात पूर्व ताडजोडीसह काल ०३ हजार ५२२ दावे निकाली निघाले असून त्यातून ०३ कोटी ४० लाख मुदतपूर्व दावे निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायालयाचे सरकारी अभियोक्ता अशोक वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हे तडजोड पूर्व दावे निकाली काढण्यासाठी या लोक न्यायालयांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकबाकी विरहित प्रकरणे ठेऊन त्यात आपल्या नियमित वसुल्या न्यायीक प्राधिकरणाकडून करून घेण्यात समाधान मानले असल्याने न्याय व्यवस्थेवर अधिकचा भार निर्माण झाला आहे.या प्रकरणावर अंकुश लावण्याचे आव्हान निर्माण झाले असल्याचे चिंताजनक चित्र आहे.

कोपरगावात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या महा लोकन्यायालयात बँका,पतसंस्था,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,ग्रामपंचायतीच्या थकबाकीतील वसुल्या,मोटार अपघात प्रकरणे,या खेरीज न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोड पात्र दिवाणी,फौजदारी प्रकरणे ठेवली गेली होती.संबंधित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कोपरगावात लोकन्यायालयाचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्या.एस.एम.बोधनकर यांच्या हस्ते तर जिल्हा न्यायाधीश एस.बी.कोऱ्हाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
सध्याचे ‘लोकन्यायालय’ म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रूप,जेथे कायदा जाणणाऱ्या नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय्य तडजोड घडवीते.समाजातील सांविधिक न्यायपद्धतीला पूरक,मुख्यत्वे लोकांचा सहभाग असलेली,पक्षकारांना परवडणारी,कमी खर्चाची आणि सुलभ व लवकर न्याय मिळवून देणारी न्याययंत्रणा.समाजातील सर्व लोकांना,विशेषतः दुर्बल,मागास व न्यायापासून वंचित असलेल्यांना,तिचा निश्चित चांगला फायदा होऊ शकतो.वर्तमानात नगरपरिषदा,महावितरण कंपनी,बँका,पतसंस्था,ग्रामपंचायती आदींच्या वसुल्या या मोठ्या जिकरीच्या बनल्या आहेत.त्यातून अनेक कज्जे निर्माण होता असून त्याचा अधिकचा भार हा न्यायव्यवस्थेवर पडत असून पुढे हेच दावे कोटीच्या संख्येने साचून त्यातून कायद्यावरच बोट ठेवले जात आहे.त्यातूनच सर्वोच्च न्यायालयाने हे तडजोड पूर्व दावे निकाली काढण्यासाठी या लोक न्यायालयांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी थकबाकी विरहित प्रकरणे ठेऊन त्यात आपल्या नियमित वसुल्या न्यायीक प्राधिकरणाकडून करून घेण्यात समाधान मानले असल्याने न्याय व्यवस्थेवर अधिकचा भार निर्माण झाला आहे.या प्रकरणावर अंकुश लावण्याचे आव्हान निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.नुकत्याच आयोजित केलेल्या लोक न्यायालयात दाखल प्रकरणांनी दाखवून दिले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश स.बा.कोऱ्हाळकर,दिवाणी न्या.सचदेव मॅडम,न्या.डोईफोडे,न्या.आर.ए.शेख,न्या.पांचाळ,न्या.,यांचे सह सहा न्यायाधीशांचा गट कार्यरत होता.त्यात जिल्हा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी,न्या.शेख यांच्या न्यायालयातील दिवाणी व भूसंपादन व फौजदारी तडजोड प्रकरणे,तर दिवाणी क्रं.२ मधील राष्ट्रीय बँका,पतसंस्था,ग्रामपंचायत,भारत संचार निगम,व सहकार न्यायालयातील प्रकरणे,तर पाच क्रमांकाच्या टेबलवर श्रीमती सचदेव यांच्या न्यायालयातील दिवाणी प्रकरणे,व न्या. डोईफोडे यांच्या समोरील कलम १३८ मधील धनादेश न वटल्याची तसेच न्या. श्री मिसाळ यांच्या समोरील फौजदारी तडजोडीची प्रकरणे,या शिवाय सहा क्रमांकाच्या टेबलवर दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे सामोरील नगरपरिषदेचे सर्व दाखल पूर्व प्रकरणे आदींचा समावेश होता.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अड्.विद्यासागर शिंदे,माजी अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे,अड्.शंतनू धोर्डे,अड्.जयंत जोशी,अड्.अशोक टुपके,वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,शंतनू धोर्डे,अशोक टुपके,अड.एस.एम.वाघ,अड्.मच्छीन्द्र खिलारी,भास्कर गंगावणे,अड्.दिलीप लासुरे,अड्.पी.सी.धाडीवाल,गौरव गुरसळ,अड्.एस.एम.सांगळे,अड्.योगेश खालकर,अड.व्ही.टी.सुपेकर,अड.बाबासाहेब सोनवणे,अड.बाळासाहेब कडू,अड.गुजराथी,अड.एस.के.जाधव,अड.विलास गोरे,अड.एम.एल.मोरे,अड्.सौ.एस.एस.देशमुख,अड्.काटे,आदींसह बहुसंख्य वकील व सरकारी वकील,दावेदार बँका,महावितरण,कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक अड्.अशोक टुपके यांनी केले तर सुत्रसंचलन अड्.अशोक वहाडणे यांनी केले आहे.तर उपस्थितांचा सत्कार अड्.जयंत जोशी यांनी केला आहे.शेवटी उपस्थितांचे आभार अड्.शंतनू धोर्डे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close