जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

…या गावात वृक्षारोपण पंधरवाड्याचा शुभारंभ

न्यूजसेवा

संवत्सर -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ग्रामपंचायत परिसर व कांदा मार्केट परिसरात सामुदायिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमात रामानंद संप्रदायाचे बहुसंख्य सेवेकरी सहभागी झाले असून जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य साप्ताहिक संतसंघाच्या भक्तीने वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली आहे.

    

   वर्तमानात वाढते प्रदूषण,घटत्या पावसाचे प्रमाण आणि जागतिक तापमानवाढ या गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण ही आज काळाची गरज बनली आहे.झाडे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन देतात,मातीची धूप थांबवतात.हवामान नियंत्रित ठेवतात.आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.वृक्ष हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि मानवाला आवश्यक असणारा प्राणवायू (ऑक्सिजन) सोडतात.जंगलतोडीमुळे बिघडलेला पावसाचा समतोल राखण्यासाठी आणि तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे.या कारणामुळे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य साप्ताहिक संतसंघाच्या भक्तीने संवत्सर येथे वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली आहे.

   या वृक्षारोपण सोहळ्या प्रसंगी नामदेवराव परजणे पाटील मंगल कार्यालय,बचतगट भवन,मार्केट यार्ड,विज वितरण परिसरात ४९५ झाडे लावण्यात आली आहे.यावेळी गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,माजी उपसरपंच विवेक परजणे आदीसह विजय आगवन,संजय भाकरे,बंडू आचारी,राजेंद्र खर्डे,बाळासाहेब गायकवाड,सागर नेहे,नारायण निरगुडे,राजेंद्र निकम,बापुराव तिरमखे,संदीप मैंद,राहूल बोरनारे,गणेश मेहेत्रे,सचिन लोखंडे,गोरख कर्पे,मुनिर शेख,महेश वर्पे,राजेंद्र नेहे,अक्षय निरगुडे,कृष्णा निरगुडे आदीसह तालुक्यातील सर्व भक्त,साधक,शिष्य,युवा सेना,महिला सेना,संग्राम सेना कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close