वन व पर्यावरण
बिबट्याचा बंदोबस्त करा -…या गावातून मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील टाकळी फाट्यानजिक एक लहान तीन वर्षीय बालिकेला बिबट्याने ठार केले असताना अवघ्या दोन दिवसात येसगाव शिवारात जनावरांना घास कापत असलेल्या शांताबाई निकोल या महिलेवर मागील महिन्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ती जागीच ठार झाली असताना काल रात्री पोकळे वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक कुत्रा ठार झाला असल्याची माहिती सरपंच सारिका विजय थोरात यांनी दिली असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने वन विभागाने बिबट्याला पिंजरा लावण्याची मागणी जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल यांचेकडे केली आहे.

“जवळकेसह,धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर,बहादरपुर आदी भागात बिबट्याचा संचार आता नियमित झाला असून याभागात जवळपास पाच ते सहा बिबटे असून त्यांना याभागात आता निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने व साठवण तलाव,के.टी.वेअर भरलेले असल्याने त्यांना मुबलक पिण्याचे पाणी मिळत आहे.शिवाय याभागात मका सारखी पिके वाढली आहे.त्यामुळे लपण्यास जागा मुबलक प्रमाणात निर्माण झाली आहे.त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची निकड निर्माण झाली आहे”-सारिका वि.थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी नाका या ठिकाणी एका ऊस तोड कामगारांच्या तीन वर्षीय बालिकेवर हल्ला चढवून तिला ठार केले होते.त्यानंतर अवघ्या तीन चार दिवसात भास्कर वस्तीजवळ 10 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सकाळी १० वाजेच्या सुमारास येसगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली महिला शांताबाई निकोले या आपल्या पशुधनास घास कापण्यासाठी गेलेल्या असताना व आपल्या कामात मग्न असताना त्यांच्यावर नजीकच्या कापूस पिकात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला असून त्यात त्या जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या.दरम्यान या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थानी वन विभागास दोषी धरून जो पर्यंत नरभक्षक बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत आपण नगर-मनमाड महामार्ग बंद केला होता.तर त्याच दिवशी सायंकाळी सुरेगाव शिवारात एका कापूस वेचणाऱ्या महिलेवर आजच पुन्हा एका बिबट्याने हल्ला चढविला होता.सुदैवाने त्यांना त्यांच्या सहकारी महिलांनी वाचवले होते.त्यानंतर वारंवार त्या भागात अनेक शेतकऱ्यांना शेत नांगरताना किंवा शेतात पाणी भरताना बिबट्या दिसून येत आहे.तर अनेकाना आपला जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे.सरकारने पिंजरे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.परिणामी काल रात्रीच्या सुमारास ॲड.विलास बाळासाहेब पोकळे यांचे वस्तीवर बिबट्याने जाऊन तेथील त्यांचा पाळीव कुत्रा फस्त केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.त्यामुळे नागरिकांना भीतीच्या सावटात शेतात जावे लागत आहे.याची गंभीर दखल घेऊन सरपंच सारिका विजय थोरात यांनी आधी दि.12 नोव्हेंबर रोजी तालुका वन अधिकारी निलेश रोडे यांचेकडे तक्रार केली होती व या भागात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती.मात्र पंधरा दिवस उलटूनही पिंजरा न लावल्याने त्यांनी नुकतीच अहिल्यानगर येथील उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल यांना निवेदन देऊन या भागात पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.

जवळकेसह धोंडेवाडी,बहादराबाद,शहापूर,बहादरपुर आदी भागात बिबट्याचा संचार आता नियमित झाला असून याभागात जवळपास पाच ते सहा बिबटे असून त्यांना याभागात आता निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने व साठवण तलाव,के.टी.वेअर भरलेले असल्याने त्यांना मुबलक पिण्याचे पाणी मिळत आहे.शिवाय याभागात मका सारखी पिके वाढली आहे त्यामुळे लपण्यास जागा मुबलक प्रमाणात निर्माण झाली आहे.परिणामी त्यांचा या भागात वावर वाढला आहे.त्यामुळे मनुष्य व पशुधनाची जीवित हानी होण्याचे आत वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ज्येष्ठ कार्यकर्ते एस.के.थोरात,सरपंच सारिका विजय थोरात,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,इंदुबाई नवनाथ शिंदे,मीना विठ्ठल थोरात,वनिता रखमा वाकचौरे,रोहिणी वाकचौरे,अरुण थोरात,रामनाथ थोरात आदींनी शेवटी केली आहे.



