वन व पर्यावरण
वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्यासाठी…हा नेता दिल्लीत जाणार!

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी आपण दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब या ठिकाणी मंगळवार दि.२२ जुलै उपस्थित राहणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आमच्या ‘न्यूजसेवा’ च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मध्ये आवश्यक सुधारणांवर धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञांशी संवाद साधून या सूचना केंद्र सरकारला देणार आहेत.वन संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनात आदिवासी आणि स्थानिक समुदायांच्या होणारा त्रास.वन्यजीव हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या पीडितांना आणि समुदायास तातडीक मदत देणे.याबद्दल सविस्तर चर्चा होणार आहेत”-रघुनाथदादा पाटील,अध्यक्ष,भारतीय किसान संघ-परिसंघ (सिफा)चे व प्रदेश शेतकरी संघटना.
दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब या ठिकाणी मंगळवार दि.२२जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑर्गनायझिंग कमिटी फार्मर्स अँड फॉरेस्ट ड्वेलर्स पार्लमेंट (Organizing Committee Farmers and Forest Dwellers Parliament) यांच्यावतीने राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.या संघटनेचे चेअरमन अँड.फ्रान्सिस जॉर्ज खासदार कोट्ययम लोकसभा केरळ आणि पि.टी जॉन जनरल मॅनेजर ऑर्गनायझिंग कमिटी फार्मर्स अँड फॉरेस्ट ड्वेलर्स पार्लमेंट केरळ यांनी भारतीय किसान संघ-परिसंघ (सिफा)चे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांना मार्गदर्शन व चर्चा करण्यास आमंत्रित केले आहे.

सन-१९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे शेती उध्वस्त होत आहे.शेतकऱ्यांना शेती करणे जिकरीचे झाले आहे.बिबट्या,मोर,हरणे,हत्ती,सायाळ, ससे,रानडुकरे,वानरे,गवे,अस्वले असे वन्य प्राणी शेतीचे व शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचे अतोनात नुकसान करत आहेत.वन विभागाकडून तोकडी मदत देऊन बोळवण केली जात आहे.या प्रश्नावर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ असल्यामुळे वनविभाग घेऊ शकत नाही.अलीकडील आकडेवारीवरून वन्यजीवांशी संबंधित मृत्यू आणि पीक विध्वंसात चिंताजनक वाढ दिसून येते.२०२४ मध्येच,जंगली हत्तींनी ०२ हजार ८०० हून अधिक लोकांचा बळी घेतला,ज्यामध्ये वाघ, बिबट्या आणि इतर प्राण्यांचे शेकडो बळी गेले. वनवासी आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष समग्र,मानवी आणि पर्यावरणीयदृष्ट्या योग्य धोरणांची तातडीची गरज अधोरेखित आहे.या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र दिल्लीत संपन्न होत आहे.

दरम्यान या चर्चासत्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे मानवी मृत्यू आणि उपजीविकेच्या विनाशात चिंताजनक वाढ होत आहे.यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे महत्त्वाचे चर्चासत्र भारतातील बागायतदार,लहान आणि सीमांत शेतकरी,आदिवासी नेते,शेतकरी संघटना, बागायत कामगार,वकिल आणि कायदेकर्त्यांना एकत्र आणणार आहे.
“वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ मध्ये आवश्यक सुधारणांवर धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञांशी संवाद साधून या सूचना केंद्र सरकारला देणार आहेत.वन संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनात आदिवासी आणि स्थानिक समुदायांच्या होणारा त्रास.वन्यजीव हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या पीडितांना आणि समुदायास तातडीक मदत देणे.याबद्दल सविस्तर चर्चा होणार आहेत”
दरम्यान सदर चर्चासत्रात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील बागायतदार,लहान आणि सीमांत शेतकरी,आदिवासी नेते,शेतकरी नेते,वन कामगार,वकिल,सामाजिक संस्था आणि कायदेकर्ते उपस्थित राहणार आहे.